राज्यामध्ये 15,16,17 व 18 जून रोजी पावसाच्या सरीवर सरी कोसळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केली नसेल त्यांनी आपल्या जमिनीमध्ये ओल पाहून पेरणी करावी.
सर्व ठिकाणी एकत्र पाऊस पडणार नाही तर, हा पाऊस भाग बदलत पडणार आहे. त्यामुळे, हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे.
पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा या सर्व भागांमध्ये दररोज पाऊस पडणार आहे.
15 जून पासून जो पाऊस पडेल तेव्हा या पावसामध्ये विजेचे प्रमाण खूप जास्त असणार आहे, वादळी वारे सुटणार आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की, झाडाखाली थांबू नये ,आंब्याच्या तसेच लिंबाच्या झाडाखाली थांबू नका ,मोबाईल टॉवरला हात लावून उभे राहू नका ,विजेच्या खांबाजवळ उभा राहू नका या भागांवर सर्वात जास्त वीज पडण्याची शक्यता असते.
अचानक हवामानामध्ये बदल झाल्यास लगेच अपडेट दिली जाईल.
-पंजाब डख हवामान अभ्यासक मु. पो. गुगळी धामणगाव तालुका सेलू, जिल्हा परभणी