अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण समाजातील जे घटक आहेत की त्यांना यातील निवारा म्हणजेच घर बांधणे आर्थिक दृष्ट्या अशक्य असते, म्हणून अशा घटकाकडे सरकार विशेष लक्ष देऊन त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत त्यांची ही गरज पूर्ण करत असते. म्हणूनच सरकारने पंतप्रधान आवास योजना ही लागू केली आहे. तसे पाहायला गेले तर ही योजना पूर्वीपासूनच चालू आहे, त्यामध्ये वेळोवेळी बदल होत गेले आहेत.
सध्या या योजनेकडे पाहायला गेले तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला की, पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आणखीन ३ तीन कोटी घरे बांधण्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत दर्शवले.
या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना घर बांधून दिले जाते किंवा आर्थिक मदत केली जाते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता घराबरोबरच शौचालय, वीज, एलपीजी कनेक्शन, नळ जोडणी अशा या सगळ्या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. म्हणूनच आपण या योजनेविषयी सविस्तरपणे पाहणार आहोत…
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजू लोकांना घर बांधून दिले जाते. त्यासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी २.५ लाख रुपयाची मदत सरकारकडून केली जाते. देशातील गरीब लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्नाच्या आधारावर अनेक गट पाडण्यात आले आहेत. या गटानुसार घरासाठी कर्ज दिले जाते. पूर्वी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्जाचे रक्कम ३ ते ६ लाख रुपये होती. त्याचबरोबर या कर्जावर अनुदानही मिळत असे. सध्या या कर्जाची मर्यादा १८ लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज करावयाची पद्धत
१. पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीन द्वारे अर्ज करता येऊ शकतो.
२. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या उत्पन्न गटात येता हे पाहणे खूपच महत्त्वाचे आहे.
३. त्यानंतर http://pmaymis.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
४. मुख्य मेन्यूमध्ये जाऊन सिटीझन असेसमेंट या ऑप्शनवर क्लिक करा आणि अर्जदार या पर्यायाला सिलेक्ट करा
५. त्यानंतर एक नवी विंडो उघडेल. तिथे तुमचा आधार नंबर टाका.
६. नंतरवैयक्तिक माहिती, बँक खात्यासंदर्भातील माहिती, तुमचा सध्याच्या घराचा पत्ता इत्यादी माहिती भरा.
७. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅप्चा कोड टाका,आणि पूर्ण माहिती व्हेरिफाय करून सबमिट करा.
आवश्यक कागदपत्रे
पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे असणे गरजेचे आहे,ती कागदपत्रे खालील प्रमाणे.
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- फॉर्म नंबर १६
- बँक खात्याचे स्टेटमेंट
- आयटी रिटर्न
अर्जदाराने अर्ज भरताना ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे खूपच गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.