मुलांचे ५ तर मोठ्यांचे १० वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य! | Aadhar card update

सध्याच्या घडीला भारतातील एक महत्त्वपूर्ण कागदपत्रापैकी म्हणून आधार कार्ड ला ओळखले जाते. म्हणजेच तुम्ही इतर कोणतेही कागदपत्रे काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड शिवाय पर्याय नाही. या कारणानेच आधार कार्ड एक किंमती दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. सध्या बाळाचेही जन्मजात आधार कार्ड काढले जाऊ लागले आहे. अनेक जण आपल्या मुलाचे आधार कार्ड काढतात. पण आधार कार्ड हे अपडेट करावी लागते. मुलांचे आधार कार्ड ५ वर्षांनी तर मोठ्यांचे आधार कार्ड १० वर्षांनी अपडेट करणे अनिवार्य आहे.

आधार कार्ड हे एक दिवसाच्या बालकापासून ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे काढले जाते. पण या बालकांचे आधार कार्ड काढताना बायोमेट्रिक ची आवश्यकता नसते, मात्र हे मूल जेव्हा ५ वर्षापेक्षा जास्त वयाचे होईल, तेव्हा त्याचे आधार कार्ड बायोमेट्रिक पद्धतीने काढावे लागते. यासाठी नोंदणीकृत महा-ई-सेवा केंद्रात  नवीन आधार कार्ड काढणे किंवा अपडेट करणे या सोयी आहेत. यासाठी कमी शुल्क देऊन आधार कार्ड काढणे व अपडेट करता येऊ शकते.

आधार ही भारतीय प्रवाशांना दिलेला बारा अंकी युनिक ओळख नंबर असतो. आधार अपडेट केल्यामुळे अनेक फायदे होतात त्यापैकी एक म्हणजे बनावट गिरी टाळण्यासाठी त्याच बरोबर फसवणूक झाली आहे हे ओळखण्यासाठी मदत होते त्यामुळे आधार कार्ड अपडेट करणे ही अनिवार्य आहे.

लहान मुलांचे आधार कार्ड ५ वर्षानंतर अपडेट करणे अनिवार्य

१ दिवसाच्या बाळापासून ते ५ वर्षाच्या बालकापर्यंत आधार कार्ड हे बायोमेट्रिक पद्धतीचा वापर न करता काढले जाते, मात्र ५ वर्षानंतर ते अपडेट करणे आवश्यक आहे. त्यानंतर १५ यावर्षी हे आधार कार्ड अपडेट करावे लागते.

मोठ्यांचे आधार कार्ड १० वर्षानंतर अपडेट करणे अनिवार्य

मोठ्यांनी आधार कार्ड काढल्यापासून १० वर्षानंतर ओळखीचा पुरावा त्याचबरोबर पत्त्याची कागदपत्रे अपडेट करणे खूपच आवश्यक आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट करणे हे अनिवार्य आहे.

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • पासपोर्ट
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मनरेगा जॉब कार्ड
  • फोटो ओळखपत्र
  • मागील तीन महिन्यांचे वीज बिल
  • किसान पासबुक

इत्यादी कागदपत्रे  आधार कार्ड अपडेट साठी ग्राह्य धरली जातात.

आधार कार्ड अपडेट करण्याचे ठिकाण

शहरातील किंवा जिल्ह्यातील कोणत्याही आधार केंद्रावर किंवा महा-ई-सेवा केंद्रावर आधार कार्ड अपडेट केले जाते. पोस्ट ऑफिस मध्येही आधार कार्ड अपडेट करण्याचे सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्येही आधार कार्ड अपडेट करता येते.

खर्च

  • बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन बदलण्यासाठी, नाव, जन्मतारीख किंवा पत्ता बदलण्यासाठी या अपडेट साठी प्रत्येकी ५० रुपये शुल्क आकारले जाते.
  • नवीन आधार कार्ड काढण्यासाठी साधारणपणे १०० रुपये शुल्क द्यावे लागते. 
  • १०० रुपयापेक्षा जास्त शुल्क आधार कार्ड काढण्यासाठी आकारले जात नाही.

आधार कार्ड अपडेट करणे हे खूपच महत्त्वाचे आहे कारण आपण जो डेटा आधार कार्ड काढत असताना दिलेला असतो त्यामध्ये पाच वर्षानंतर किंवा दहा वर्षानंतर जास्त करून बदल झालेले असतात. त्यामुळे आधार कार्ड हे अपडेट करणे अनिवार्य आहे.

Leave a Comment