सध्या पाहायला गेले तर सर्वत्र चार चाकी गाडी विषयी प्रत्येकाला आकर्षण आहे. म्हणजे प्रत्येकाला असे वाटते की आपल्याकडे एखादी चार चाकी गाडी असावी. त्यातल्या त्यात कुटुंबाला घेऊन फिरण्यासाठी एखादी गाडी असेल तर सोन्याहून पिवळे. त्यासाठी तुम्ही जर चार चाकी गाडी घेण्याचे नियोजन करत असाल तर, या लेखामध्ये आपण अशा काही चार चाकी गाड्या पाहणार आहोत की ज्यांना भारतीय बाजारपेठेत अलीकडे खूपच मागणी आहे.
अनेक जण सेवन सीटर चार चाकी गाडी खरेदी करण्यात खूपच रस दाखवत आहेत. म्हणूनच आज आपण तुमच्यासाठी टॉप ३ कार गाडीची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर…
महिंद्रा स्कार्पियो (N)
महिंद्रा कंपनीची ही एक खूपच लोकप्रिय गाडी आहे, ती म्हणजे महिंद्रा स्कार्पियो एन. ही स्कार्पिओ तिसऱ्या जनरेशनची एसयूव्ही आहे. ही महिंद्रा स्कार्पियो भारतात ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रमुख आकर्षण आहे. म्हणूनच या गाडीची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ही महिंद्रा स्कार्पियो गाडी नवीन फीचर्स सह आणि अप ग्रेडेड पावर ट्रेन सह बाजारात उपलब्ध आहे.
ही एसयुव्ही कार ६ आणि ७ सीटर मध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे ७ सीटर स्कार्पिओ एन च्या किमती बद्दल बोलायचे झाले तर,ही गाडी १३.८५ लाख रुपयाच्या एक्स – शोरूम किमतीमध्ये उपलब्ध आहे. या यसयुव्ही मध्ये पावर ट्रेन म्हणून २ लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळेल, जे की जास्तीत जास्त २०३ बीएचपी आणि ३८० एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते.
महिंद्रा स्कार्पियो क्लासिक
महिंद्रा ही देशातील एक अग्रगण्य अशी ऑटोमोबाईल कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक एसयुव्ही गाड्या खूपच लोकप्रिय आहेत. स्कार्पिओ क्लासिक ही गाडी देखील ग्रामीण तसेच शहरी भागातील तुम्हाला सहजपणे दिसून येते. यावरूनच ही गाडी भारतामध्ये किती लोकप्रिय आहे हे समजते.
महिंद्रा स्कार्पियो क्लासिक ची किंमत भारतीय बाजारात १३.५९ लाख रुपयांपासून उपलब्ध होते. म्हणजेच या गाडीची बेस्ट मॉडेल ची किंमत १३.५९ लाख रुपये आहेत.
या कारमध्ये २.२ लिटरचे डिझेल इंजिन आहे, जे की जास्तीत जास्त १३० बीएचपी पॉवर आणि ३०० एनएम चा एक टॉर्क जनरेट करण्यासाठी दावा कंपनीकडून केला जातो आहे. कारची इंजिन ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
टाटा सफारी
टाटा मोटर्स ही देखील भारतीय तसेच जागतिक बाजारातील एक अग्रगण्य अशी कंपनी आहे. टाटा सफारी ही या कंपनीची सर्वात लोकप्रिय अशी एसयुव्ही पैकी एक कार आहे. ही गाडी टाटा मोटर्स या कंपनीची एक सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून ओळखली जाते. या गाडीची किंमत ही १६.१९ लाख रुपयापासून सुरू होते.
या गाडीमध्ये २.० लिटर डिझेल इंजिन आहे, ज्यामुळे जास्तीत जास्त १७० बीएचपी पॉवर आणि ३५० एनएम चा पिक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा टाटा मोटर्स कंपनीने केला आहे.
टाटा मोटर्स कंपनी ही लवकरात लवकर सफारीचे पेट्रोल व्हर्जन आणि इफि वर्जन लॉन्च करणार आहे. अशी माहिती देखील समोर आली आहे.