आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते .शेती हा उदरनिर्वाहाचा मुख्य साधन आहे. पण या पिकांसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत नाही त्यामुळे राज्य सरकारच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पाण्याचा श्वास होत स्त्रोत निर्माण करण्यासाठी जलसंधारण विभागातर्फे सुरू करण्यात आलेली महत्त्वाची ही योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे निर्माण करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते..राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे . राज्यातील शेतकरी दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्याच्या कुटुंबाचे जीवन शेती पिकावर अवलंबून असते शेतीसाठी ते बँक, साहुकार यांच्याकडून व्याजाने कर्ज घेतो व अहोरात्र ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता शेती करतो शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते परंतु राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी तसेच अनिश्चित झाले आहे व त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पुर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांचे पाण्याअभावी मोठे नुकसान होते आहे व त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे व याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे व कर्जाच्या बोज्याखाली दबलेला शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला Shettale Yojana जाहीर केली.
या योजनेची उद्दिष्टे
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतात तळे खोदण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- शेती पिकाचे होणारे नुकसान टाळणे व शेतीच्या उत्पन्नात वाढ करणे
- शेतकऱ्यांना आर्थिक फायदा करणे व शेतीसाठी प्रोत्साहित करणे
- नवीन युवा पिढीचे शेतीकडे कमी होत असलेल्या आकर्षण वाढवणे व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे
- शेतकऱ्यांना सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व शेततळे बांधण्यासाठी शेतकऱ्यांना कोणाच्याही पैशावर अवलंबून राहण्याची गरज भासून न देणे व कोणाकडूनही जास्त व्याजदराने पैसे घेण्याची गरज भासून न देणे हे मागील त्याला शेततळे योजना 2024 चे उद्दिष्ट आहे
या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र
◽ ज्या जमिनीवरती शेततळे काढायचे आहे त्या जमिनीचा सातबारा आणि आठ अ उतारा
◽शेतकऱ्याच्या आधार कार्ड झेरॉक्स
◽बँक पासबुक झेरॉक्स
◽हमीपत्र आणि जातीचा दाखला असेल तर
◽पासपोर्ट साईज दोन फोटो
मागेल त्याला शेततळे त्यानुसार अनुज्ञेय आकारमान व अनुदान
- या योजनेअंतर्गत खालील आकारमानापैकी एका प्रकारचे शेततळे घेण्यास मुभा राहील.
- आकारमान निहाय शेततळयाचे पृष्ठभागा वरील क्षेत्रफळ आणि अपेक्षित खोदकाम खालील प्रमाणे राहील.
- शेततळे अनुदान योजना अंतर्गत वरीलप्रमाणे विविध आकारमानाच्या शेततळ्यांपैकी कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येईल.
- यामध्ये जास्तीत जास्त 30x30x3 मीटर या आकारमानाचे व कमीत कमी इनलेट आऊटलेटसह प्रकारामध्ये किमान 15X15X3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
- तसेच इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारामध्ये किमान 20×15 x3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल.
- इनलेट आऊटलेट विरहीत प्रकारामध्ये पाणी भरण्याची कार्यवाही पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्यातून प्राधान्याने करावी. [शेततळे अनुदान योजना]
वैयक्तिक शेततळ्यासाठी किती अनुदान मिळते
यापूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत 50 हजाराचे अनुदान मिळत होते मात्र आता ही रक्कम जास्तीत जास्त 75000 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
जर शेतकऱ्यांनी अस्तरीकरणासह अर्ज केला तर मात्र अनुदानाची ही रक्कम दीड लाखापर्यंत जाते. यामध्ये शेतकऱ्यांना आकारमानानुसार अनुदान दिले जाते.
15×15×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 28 हजार 275 रुपये, 20×25×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 31 हजार 598, 20×20×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 41 हजार 218 रुपये, 25×20×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 49 हजार 671, 25×25×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 58 हजार 700 रुपये, 30×25×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 67 हजार 728, 30×30×3 आकाराच्या शेततळ्यासाठी 75 हजार रुपये एवढे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.