उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपणास विजेच्या टंचाईला सामोरे जावे लागते. विजेची टंचाई म्हणजे उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर अचानकपणे वाढला जाऊन विजेची कमतरता पडते, त्यामुळे वीज कपातीला आपणाला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात म्हणजेच मान्सून पूर्व वादळी पावसामुळे आपणास वीज कपातील सामोरे जावे लागते कारण वादळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब,तारा यांचे नुकसान होते. म्हणूनच आपणास यावर मात करण्यासाठी एक उपाययोजना म्हणून किंवा आपत्कालीन परिस्थितीत एक ऊर्जा बॅकअप म्हणून सोलर जनरेटर विषयी माहिती पाहणार आहोत.
यावर्षी उष्णतेने सर्वांना हैराण करून टाकले आहे, त्यामुळे अनेकांना खूप साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. उन्हाळ्यामध्ये विजेचा वापर वाढला की ऑटोमॅटिक वीज खंडित होण्याची प्रक्रिया होतच असते. अशावेळी घरी जर एखादा इन्व्हर्टर असेल तर तोही व्यवस्थितपणे काम करत नाही. म्हणूनच घरातील एखादे उपकरण या इन्व्हर्टर आधारित चालवायचे म्हटले तर तेही या परिस्थितीत चालू शकत नाही.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण एक मिनी जनरेटर विषयी पाहणार आहोत. जो की आपण अगदी आरामात चालू शकतो,त्याचा आकार इतका लहान आहे की तो कुठेही घेऊन जाता येतो,आणि त्याचबरोबर तो कोठेही बसवता येतो. याची निर्मिती ही नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे. चला तर मग या जनरेटर विषयी सविस्तरपणे पाहूया…
पोर्टेबल पॉवर स्टेशन
आपण ज्या जनरेटर विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत त्याचे नाव आहे पोर्टेबल पॉवर स्टेशन. पोर्टेबल पावर स्टेशन ३००W( पीक ६००W),GRECELL २८८ Wh सोलर जनरेटर आहे. हा जनरेटर ६०W USB-C PD या आउटपुटसह येतो. ज्यामध्ये ११०V प्युअर सायन वेव्ह एसी आउटलेट बॅकअपची उपलब्धता आहे. हा जनरेटर लिथियम बॅटरीच्या आधारे चालतो.
हा पोर्टेबल जनरेटर असून तो कोठेही घेऊन जाता येतो. या जनरेटरचा आकार खूपच लहान आहे. या जनरेटरच्या साह्याने घरातील टीव्ही,पंखा आणि इतर उपकरणे जास्त कालावधीपर्यंत चालू शकतात.
हा जनरेटर घरात तर वापरता येतोच पण घराबाहेरही याचा वापर करता येतो. हा खूपच हलका असल्यामुळे बॅगमध्ये सहजपणे बसतो. अचानक पणे विजेची टंचाई भासू लागली तर हा सौर ऊर्जा जनरेटर खूपच फायदेशीर आहे.
हा जनरेटर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर, तुम्ही Amazon वरून ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता. याची Amazon वर किंमत २४,९९० रुपये इतकी आहे.
अशाप्रकारे तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत एक ऊर्जा बॅकअप म्हणून या जनरेटरचा वापर करू शकता.