शेळी – मेंढी पालन अनुदान योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड यासाठी मिळवा 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेळी व  मेंढी पालन योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो देशातील सुमारे 55 टक्के पेक्षा जास्त लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत .

आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनही हा व्यवसाय केला जातो पण आज या व्यवसायाचे स्वरूप दिवसेंदिवस आधुनिकरणामुळे बदलत चालले आहे. या बदलाबरोबरच शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो.

जसे की पशुपालन कुक्कुटपालन शेळीपालन मत्स्यपालन वराह पालन हे पूरक शेतीपूरक व्यवसाय केले जातात या व्यवसायामध्येही मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पण अजूनही शेती क्षेत्रातील काम करणाऱ्या कुटुंबाचा समावेश हा दारिद्र्यरेषेखाली किंवा अल्पभूधारक म्हणून होतो यांच्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर योजना आणत असते या योजनेद्वारे त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे हा हेतू सरकारचा असतो ,म्हणूनच सरकारने शेळी व मेंढी पालन योजना ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी म्हणून अमलात आणली आहे.

आज आपण या लेखामध्ये या योजनेसाठी कोणती कागदपत्रे त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत त्याचबरोबर योजनेच्या अनुदान याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

शेळी व मेंढी पालनाविषयी थोडक्यात…

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेळी व मेंढी पालन हा व्यवसाय पूर्वीपासून चालत आलेला आहे पूर्वी या व्यवसायाचे स्वरूप फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून होत असे पण आता त्याचे स्वरूप बदलले आहे आता या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देऊन या व्यवसायाला फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून असलेली ओळख आता राहिलेली नाही. त्याचे रूपांतर मुख्य व्यवसाय म्हणून ओळख बनलेली आहे.

सध्याची देशांमधील किंवा राज्यांमधील बेरोजगारीचे प्रमाण पाहिले असता देशातील तरुण वर्ग या व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहे. यामधील तरुणांचा वाढता सहभाग किंवा संख्या लक्षात घेता सरकार या व्यवसायाला चालना देण्यासाठी शेळी व मेंढी पालन योजना अमलात आणत आहे जेणेकरून बेरोजगारी प्रमाण कमी होऊन तरुण स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या सक्षम राहतील हा या योजनेचे मुख्य लक्ष असू शकते.

शेळी व मेंढी पालन व्यवसाय हे चांगले उत्पन्न देणारे व्यवसाय आहेत कमी जागेत ,कमी चारा ,कमी भांडवल गुंतवणूक यासारख्या कमी गोष्टी वापरून जास्त उत्पन्न मिळते हा या व्यवसायाचा खूप मोठा फायदा आहे. म्हणून या व्यवसायाला चालना देण्यासाठी 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान सरकार मार्फत दिले जाणार आहे याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

शेळीपालन व मेंढी पालनअनुदान योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतात?

या योजनेचा लाभ हा प्रत्येक शेतकरी किंवा अर्जदाराला देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. पण यामध्ये श्रेणीनुसार हा लाभ देण्याची सरकारची भूमिका असेल असे सरकारकडून सांगण्यात आले आहे . या श्रेणी प्रकारात जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेळी- मेंढी पालन योजना 2024 अनुदान लाभार्थी:

  • अल्पभूधारक शेतकरी म्हणजेच की ज्यांचे क्षेत्र दोन हेक्टर किंवा पाच एकर पेक्षा कमी असेल ते शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत
  • दारिद्र्यरेषेखालील अर्ज करणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ हा त्वरित मिळणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
  • बेरोजगार तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा त्यांच्या रोज गारीचा प्रश्न मिटवण्यासाठी देखील या योजनेचा खूप चांगला फायदा होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेचा लाभ प्रामुख्याने घेता येणार आहे.
  • एखाद्या कुटुंबातील महिला प्रमुख असेल तर त्या सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.
  • बचत गटातील महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे जर तुम्ही सुद्धा एखाद्या बचत गटात सदस्य म्हणून कार्यरत असाल तर तुम्ही या योजनेसाठी त्वरित अर्ज करू शकता.

आवश्यक कागदपत्रे:

जर तुम्ही शेळी व  मेंढी पालन अनुदान योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते ती कागदपत्रे खालील प्रमाणे.

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • जमिनीचा 7/12 व 8अ उतारा
  • अर्जदाराचा रहिवासी दाखला
  • अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती
  • जातीचा दाखला (गरज असेल तर)
  • अर्जदार जर दिव्यांग असेल तर शासनमान्य दिव्यांग प्रमाणपत्र
  • पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र

पात्रता:

  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे मॉडेल प्रोजेक्ट अहवाल असणे महत्त्वाचे आहे त्यामध्ये बकरी विकत घेण्याबद्दल बकरीची खरेदी किंमत व घर खर्च किंवा लाभांश इत्यादी बाबींचा समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला त्याने स्वतः दोन लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे. जर शेतकरी कर्ज घेण्यास तयार असेल तर त्याच्याकडे एक लाख रुपये चा चेक/ पासबुक /एफडी किंवा कर्ज घेण्यासाठी इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे असणे अत्यंत गरजेचे आहे.
  • शंभर बकऱ्यांसाठी नऊ हजार चौरस मीटर जमीन असणे अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर त्या जागेचा नकाशा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे जर जमीन भाड्याची असेल तर भाड्याची पावती/ एलपीसी /प्लीज कागदपत्रे आवश्यक आहेत.

शेळी व मेंढी पालन अनुदान योजनेतील मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप:

  • या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा खुल्या प्रवर्गातील किंवा मागास प्रवर्गातील असेल तर त्याला लाभ मिळणाऱ्या रकमेतील 50% चा राज्य सरकार भरते व उर्वरित पन्नास टक्के हा अर्जदाराला सत्ता भरावा लागतो. जर तो हा 50% चा स्वतः भरू शकत नसेल तर त्याला बँकेतून कर्ज पद्धतीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने भांडवल उभारणी करणे आवश्यक आहे.
  • अर्जदार हा अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गात येत असेल तर त्याला मिळणाऱ्या एकूण लाभार्थी रकमेच्या 75 टक्के हिस्सा हा राज्य सरकार मार्फत भरलेला असेल तर उर्वरित 25 टक्के हिस्सा हा स्वतः लाभार्थी रकमेच्या स्वरूपात किंवा बँकेतून लोन करून किंवा इतर मार्गाने भरायचा आहे.
  • अर्जदार किंवा लाभार्थ्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरी बँकेकडून लोन प्रकरण मंजूर झाले तरी बँक जास्तीत जास्त वीस टक्के कर्ज तुम्हाला देणार आहे म्हणजेच उर्वरित पाच टक्के रकमेची व्यवस्था ही स्वतः करावी लागणार आहे.

या योजनेचा अर्ज कुठे करायचा?

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणारी सर्व कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमचा अर्ज भरायचा आहे. अर्ज भरून झाल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर अर्ज करताना काही बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही.

अर्ज करताना घ्यावयाची काळजी:

  • अर्जाचा फॉर्म भरताना आपली माहिती व्यवस्थित भरून घ्यावी.
  • माहिती अर्धवट असल्यास तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
  • योजनेसाठी अर्ज करताना लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती अपलोड करण्याआधी तपासून घ्यावीत.
  • अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवावी.
  • अर्ज दाखल करताना तुमचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा.

अशाप्रकारे उपरोक्त माहितीच्या आधारे शेतकरी मित्र याप्रकारे या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि एक आर्थिक स्वायत्तता प्रधान करून घेऊ शकतात.

Leave a Comment