राज्यात 1 ते 6 जून पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहणार: पंजाब डख.
🛑7 जून पासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार: पंजाब डख.
राज्यातील शेतकऱ्यांनी हळद मूग तसेच उडीद पिकाची पेरणी करू शकता. या आठवड्यामध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. तुमच्या भागामध्ये जमिनीतून किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा.
राज्यामध्ये 1 जून पासून 6 जून पर्यंत पाऊस उघडीप देणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आपटून घ्यावीत.
🔴 7 जून पर्यंत शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे आटपून घेतली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना शेतामध्ये उघडीप मिळणे खूपच अवघड आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या आठवड्यामधील सर्व कामे आटपून घ्यावीत.
7 जून पासून 10 जून पर्यंत राज्यात पुन्हा पाऊस हजेरी लावेल, तसेच 13 जून नंतर सुद्धा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
तुमच्या भागाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.. तालुक्या नुसार हवामान अंदाज पहा…
⭕ ७ जून पर्यंत जोरदार वारे वाहणार आहे.
⭕ बऱ्याच ठिकाणांमध्ये जमिनी मध्ये चांगली ओल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे, तुमच्या भागामध्ये जमिनीमध्ये ओल किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करून घेऊ शकता.
⭕ या महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
तुमच्या भागाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.. तालुक्या नुसार हवामान अंदाज पहा…
एक जून नंतर पुढील ६ जून पर्यंत राज्यामध्ये सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी.
अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यास लगेच अपडेट दिली जाईल.
पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु पो गुगळी धामणगाव
तालुका सेलू जिल्हा परभणी