20 तारखेपर्यंत पाऊस पडणार, पण जून च्या शेवटच्या आठवड्यानंतर पुन्हा पाऊस – पंजाब डख हवामान अंदाज

ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये चांगली ओल झालेली आहे त्यांनी पेरणी करू शकता.

राज्यातील शेतकऱ्यांनी हळद मूग तसेच उडीद पिकाची पेरणी करू शकता.

🔴चांगला पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये ओल पाहून पेरणीचा निर्णय घेऊ शकता.

ज्यांचा जमिनीमध्ये अजूनही ओल झालेली नाही त्यांनी पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा.

🔴 राज्यामध्ये 20 जून पर्यंत पाऊस पडणार आहे व त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यापासन पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे.

🔴 20 जून नंतर स्थानिक वातावरण तयार होऊन कुठेतरी पाऊस पडू शकतो. पण सर्व दूर नाही

🔴 या शेतकऱ्यांचे पेरणीयोग्य पाऊस झाला नाही, अशा भागात 27 जून नंतर पाऊस पडेल.

हा पाऊस विजांच्या कडकटा सोबत पाऊस पडणार असल्यामुळे शेतामध्ये तसेच झाडाखाली शेतकऱ्यांनी थांबू नये, आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.

तुमच्या भागाचा हवामान अंदाज पाहण्यासाठी तालुक्या नुसार हवामान अंदाज पहा.🙏

⭕ पुढील 20 जून पर्यंत पाऊस, नंतर पाऊस उघडणार आहे

⭕ बऱ्याच ठिकाणांमध्ये जमिनी मध्ये चांगली ओल झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सुरुवात केलेली आहे, तुमच्या भागामध्ये जमिनीमध्ये ओल किती आहे हे पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करून घेऊ शकता.

⭕ या महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस राहणार आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

ज्या ज्या ठिकाणी पावसाने अजून पर्यंत हजेरी लावलेली नाही , अशा ठिकाणी 27 जून नंतर पाऊस पडणार आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बातमी.

अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यास लगेच अपडेट दिली जाईल.

पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु पो गुगळी धामणगाव
तालुका सेलू जिल्हा परभणी

Leave a Comment