भारतामध्ये अजूनही ग्रामीण भागात त्याचबरोबर शहरी भागातील जनता ही स्वतःच्या मेहनतीच्या कमाईवर कोणत्याही प्रकारची गुंतवणुकीच्या बाबतीत रिस्क घेत नाही. पण त्यांची हीच मेहनतीची कमाई जर पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करायची म्हटले तर ते डोळे झाकून गुंतवणूक करण्यास तयार होतात. म्हणजेच स्वातंत्र्य अगोदर पासून किंवा स्वातंत्र्यानंतर पोस्ट ऑफिस ने भारतीय लोकांमध्ये तेवढी विश्वासार्हता स्वतःमध्ये निर्माण केली आहे. म्हणजेच भारतीय लोक पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्यास डोळे झाकून तयार होतात.
तसे पाहायला गेले तर पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, ज्यामध्ये तुम्ही कमी वेळेत मोठा नफा मिळवू शकता. त्यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत सांगायचे झाले तर पोस्टाची एफडी म्हटले तर वावगे ठरणार नाही.
चला तर मग पाहूया या योजनेतून किती गुंतवणुकीवर तुम्हाला किती व्याजदर मिळतो हे सविस्तर पाहू.
एफडी करण्यासाठी बँका सुद्धा एक पर्याय आहे, पण ५ वर्षाची एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिस मध्ये तुमच्या गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळतो. सध्या पाहायला गेले तर पोस्ट ऑफिस च्या ५ वर्षाच्या एफडीवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. आणि त्यासोबत ५ वर्षाच्या एफडी मध्ये इन्कम टॅक्स ८० सी अंतर्गत टॅक्समध्ये सवलत देखील मिळते.
पोस्ट ऑफिसच्या एफडी मध्ये १,००,००० (१ लाख), २,००,००० (२ लाख), ३,००,००० (३ लाख) रुपयांच्या एफडीतील व्याजातून किती रिटर्न मिळेल हे सविस्तर पाहू.
३,००,००० रुपयांच्या एफडी वरील रिटर्न
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये ३,००,००० रुपये ५ वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवले तर फक्त ७.५ टक्के व्याजदराने १,३४,९८४ रुपये व्याज मिळेल. यामध्ये मॅच्युरिटीवर (परिपक्वता) एकूण ४,३४,९८४ रुपये मिळतात.
२,००,००० रुपयांच्या एफडी वरील रिटर्न
पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये २,००,००० रुपये ५ वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवले तर ७.५ टक्के व्याज दराने ८९,९९० व्याज वर्षानंतर तुमच्या मॅच्युरिटी वर एकूण २,८९,९९० रुपये मिळतील.
१,००,००० रुपयांच्या एफडी वरील रिटर्न
१,००,००० रुपये अशी रक्कम आहे की,जी कोणीही पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये अगदी सहजपणे भरू शकेल. या रकमेवर ७.५ टक्के व्याजदरानुसार ४४,९९५ रुपये व्याज मिळते. पाच वर्षानंतर एकूण १,४४,९९५ रुपये मिळतात.
टाईम डिपॉझिट स्कीम मुदतवाढ
ज्यांना कोणाला पोस्ट ऑफिस एफडी मुदत वाढवून आणखीन जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. पोस्ट ऑफिस एफडी चा कालावधी संपल्याच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत १ वर्षाची पोस्ट ऑफिस एफडी, तर १२ महिन्याच्या आत २ वर्षाची एफडी, आणि १८ महिन्याच्या आत ३ आणि ५ वर्षाची एफडी ला मुदतवाढ मिळू शकते.
याशिवाय खाते उघडताना तुमच्या एफडीचा कालावधी संपल्यानंतर अकाउंट मुदतवाढी साठी विनंती करू शकता. मुदतपूर्तीच्या दिवशी संबंधित टीडी खात्यावर लागू होणारा व्याजदर वाढीव कालावधी नंतर लागू होईल.
कोणत्याही स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे खूपच फायदेशीर आहे. म्हणजेच आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करणे हे तुम्हाला आर्थिक नुकसानीपासून वाचवते.