पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढली | police bharti 2024

उमेदवारांना दिलासा, मराठा आरक्षणासाठी एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने मुदतवाढ

मुंबई: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधी ३१ मार्च होती. मराठा आरक्षणासाठी लागणारे एसईबीसी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

अंतिम तारखेपर्यंत कायदपत्रे मिळाली नाहीत तर काय?

अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणं आवश्यक आहेत.

पोलीस भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

पोलीस भरतीसाठी शैक्षणिक अर्हता:

  • महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965 (सन 1965 चा महा. अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
  • SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • जन्म दाखला,
  • रहिवाशी प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात-वैधता प्रमाणपत्र,
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),
  • खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे),
  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र,
  • माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
  • गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र,
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
  • भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
  • पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
  • अनाथाबाबतचे प्रमाणपत्र,
  • अंशकालीन प्रमाणपत्र,
  • इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,
  • NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.

अधिक माहितीसाठी:

टीप:

  • उमेदवारांनी वेळेवर अर्ज करणं गरजेचं आहे.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या जमा करा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.

Leave a Comment