पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज कसा करावा
PM Surya Ghar Yojana online application
- तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.( रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया खाली दिलेली आहे ) रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तो खालील पद्धतीने भरा.
- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला , खाली👇 दिलेल्या येथे क्लिक करा या बटन वर क्लिक करावे लागेल, तेथे गेल्यावर Login Here हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर आणि संकेतांक टाका.
- यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर नवीन होमपेज उघडेल.
- त्यामध्ये Apply for Rooftop Solar Installation हा फॉर्म दिसेल तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे.
- त्या फॉर्ममध्ये एप्लीकेशन डिटेल्स म्हणजे त्या मध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तिथे upload करावे लागतील.
- त्यानंतर तुम्ही संपूर्ण फॉर्म पुन्हा एकदा चेक करून फायनल सबमिट करावा यानंतर तुमचा फॉर्म तपासणीसाठी जाईल आणि त्यानंतर तुम्हाला मंजुरी मिळेल आणि मग तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेसाठी रजिस्ट्रेशन कसे करावे
- रजिस्ट्रेशन करण्यासाठी खाली दिलेल्या ‘रजिस्ट्रेशन’ या बटनवर क्लिक करा, तिथे तुम्हाला apply solar हा पर्याय दिसेल, त्या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- त्यामध्ये registration here या पर्यायावर क्लिक करा.
- त्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा निवडावा लागेल.
- त्यानंतर वीज वितरण कंपनी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक तेथे टाका.
- यापुढे next या बटन वर क्लिक करा.
- नेक्स्ट बटन वर क्लिक केल्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मग तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाका.
- त्यानंतर तुम्हाला एक कॅपच्या दिसेल तो कॅपच्या टाका नंतर सबमिट बटन वर क्लिक करा.
- अशा पद्धतीने तुमची नवीन नोंदणी झालेली होईल.