मुलांच्या भविष्यासाठी सरकारनं ‘एनपीएस वात्सल्य’ योजना (NPS Vatsalya Scheme) सुरु केलीय.
NPS Vatsalya Scheme News : केंद्र सरकार (Central Govt) विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता केंद्र सरकारनं नवीन एक योजना सुरु केली आहे. मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारनं ‘एनपीएस वात्सल्य’ योजना (NPS Vatsalya Scheme) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे.
NPS वात्सल्य योजनेची बातमी पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा👇👇👇👇
या योजनेमुळं पालकांना आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षीत करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे. पालक ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत खाते उघडू शकतात. खाते उघडण्यासाठी किमान 1000 रुपये आणि कमाल अमर्यादित पैसे गुंतवू शकतात. मुले 18 वर्षांची होईपर्यंत हे खाते पालक चालवतील व 18 वर्षांनंतर हे खाते मुले स्वतः चालवतील. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येत आहे.
NPS वात्सल्य योजनेची बातमी पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा👇👇👇👇
NPS वात्सल्य योजनेत कसा आणि किती परतावा मिळू शकतो हे समजून घेऊया –
समजा, वयाच्या 19 ते 60 वर्षापर्यंत मुलांनी दरमहा 1000 रुपये गुंतवले तर अशाप्रकारे एकूण 60 वर्षांच्या कालावधीत एनपीएस वासल्य योजनेत 7 लाख 20 हजारांची गुंतवणूक. यातून जवळपास तुम्हाला 3 कोटी 76 लाखांचं व्याज मिळू शकते. अशाप्रकारे तुमचा एक कॉर्पस 3 कोटी 83 लाख होईल. समजा वयाच्या 60 व्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी सर्व पैसे ॲन्युइटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतल्यास, त्या प्लॅनमध्ये व्याजदर फक्त 5-6% असला तरी मुलांना वर्षाला 19 ते 22 लाख व्याज मिळेल. व्याजाच्या या रकमेमुळे दरमहा दीड ते दोन लाख रुपये हमीची पेन्शन मिळेल. या योजनेत आई-वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत करू शकतात. त्यामुळे तुमच्या मुलाच्या भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच पैसे गुंतवू शकता.
How to apply for NPS Vatsalya : कसा करणार अर्ज
आई-वडील बँक, टपाल खाते, पेन्शन फंड वा ई-एनपीएस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एनपीएस वात्सल्य योजनेत सहभागी होऊ शकतो. ICICI Bank ने मुंबईतील सेवा केंद्रावर या योजनेची सुरुवात केली आहे. नवीन खात्यांची नोंद केली आणि तरुण ग्राहकांसाठी प्रतिकात्मक PRAN कार्ड दिले.
NPS वात्सल्य योजनेची बातमी पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा👇👇👇👇
योजनेचे प्रमुख फायदे काय?
– या योजनेमुळे पालकांना मुलांच्या पेन्शनसाठी गुंतवणूक त्यांच्या लहाणपणापासूनच करण्यात येऊ शकते
– दीर्घ काळ गुंतवणूक केल्यानं त्याचा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
– या योजनेतील गुंतवणुकीमुळे करामध्येही सवलत मिळेल
– योजनेतील रक्कम आणि अवधी निवडण्याची पद्धत लवचिक आहे. तुम्ही ती तुमच्या सोयीनुसार निवडू शकता
– मुलांच्या नावावं खातं असल्यानं त्यांना याबाबतचा निर्णय घेणं सोपं आहे.