लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीए सरकारने बहुमत मिळवले, या बहुमताच्या जोरावरच एनडीए सरकारने आपले सरकारही स्थापन केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपला बहुमत मिळाले नाही त्यांना त्यांच्या मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले, त्यामुळे मोदी हे गेल्या दोन टर्ममध्ये कोणत्याही मित्र पक्षाच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत होता. पण तिसऱ्या टर्मला त्यांना मित्र पक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करावी लागत आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळामध्ये मित्र पक्षांचे वजन वाढले आहे . म्हणूनच खाते वाटप करताना मित्र पक्षांकडे कानाडोळा करून चालणार नाही. म्हणूनच नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात मोठे बदल केले आहेत. यापूर्वीच्या अनेक मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन चेहऱ्यांचा समावेश आपल्या मंत्रिमंडळात केला आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती ही जुन्या चेहऱ्यांच्याकडेच ठेवण्यात आली आहे, त्यामध्ये कोणताही बदल केला नाही.
अमित शहा यांच्याकडे गृहमंत्री पदाबरोबरच सहकार खात्याचाही कार्यभार देण्यात आला आहे, त्याचबरोबर शिक्षण खात्याचा कार्यभार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. अर्थ मंत्रालय हे निर्मला सीतारामन यांच्याकडेच कायम ठेवलेले आहे. परराष्ट्र मंत्रालय एस जयशंकर यांच्याकडे तर रक्षा मंत्रालय राजनाथ सिंग यांच्याकडे तर रस्ते व वाहतूक मंत्रालय नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले आहे. वरील खातीही मोदींच्या दुसऱ्या टर्म मधील मंत्र्यांच्याकडेच कायम ठेवले आहे. यामध्ये कोणताही बदल केलेला नाही.
महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, रक्षा खडसे, डॉ.भागवत कराड यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या खात्याचा कार्यभार सोपवला आहे.
मोदी सरकारचं मंत्रिमंडळ आणि खाती
स्वतंत्र प्रभार असणारे राज्यमंत्री आणि राज्यमंत्री
अशाप्रकारे २०२४ मध्ये नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे यामध्ये भाजप व त्यांच्या मित्र पक्षांमध्ये समतोल साधण्याचे काम मोदींनी केले आहे. जुन्या चेहऱ्याबरोबरच नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. त्याचबरोबर मोदींनी युवा नेतृत्वालाही मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतले आहे.