Samsung Galaxy Z Fold 6 लवकरच भारतात होणार लॉन्च, आकर्षक फीचर्स सह!

स्मार्टफोन उद्योगात फोल्डेबल फोन टेक जायंट सॅमसंगने सादर केले होते. सॅमसंगने अनेक फोल्डेबल आणि फ्लिप स्मार्टफोन यापूर्वी बाजारात आणले आहेत. सॅमसंग आता आपल्या ग्राहक वर्गासाठी नवीन फोल्डेबल फोन आणण्याच्या तयारीत आहे. अनेक कंपन्यांची आगामी फोल्डेबल मालिका Samsung Galaxy Z Fold 6 कदाचित असू शकते. 

बहुतांश स्मार्टफोन कंपन्या आता फोल्डेबल फोनवर आपले लक्ष केंद्रित करत आहेत. अलीकडच्या काळात फ्लिप आणि फोल्डेबल फोनची क्रेझ मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सॅमसंगची आगामी Samsung Galaxy Z Fold 6 मालिका गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसली या फोनची झलक

कंपनीने Samsung Galaxy Z Fold 6 चे सपोर्ट पेज लाईव्ह केले आहे. हा आगामी फोन मॉडेल क्रमांक SM-F956B/DS सह समर्थन पृष्ठावर सूचीबद्ध आहे. सपोर्ट पेज लाइव्ह झाल्यामुळे आता कंपनी लवकरच बाजारात लॉन्च करू शकते असे मानले जात आहे. सपोर्ट पेज येण्याआधीच हा स्मार्टफोन अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर दिसला आहे. 

या फोल्डेबल फोनच्या लॉन्चबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने अद्याप सपोर्ट पेजवर याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून दिलेली नाही. या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून समोर आलेली नाही. मात्र, सॅमसंग कंपनी हा फोन 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या किमती पर्यंत बाजारात लॉन्च करू शकते, असा अंदाज लावला जात आहे.

Samsung Galaxy Z Fold 6 चे महत्वाचे तपशील

  • Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन शकते.
  • Samsung Galaxy Z Fold 6 च्या आतील बाजूस 6.3 इंचाची मोठी स्क्रीन दिसून आली आहे.
  • दोन्हीही स्क्रीन AMOLED पॅनेलसह येतील, ज्याचा रिफ्रेश दर 120hz असेल.
  • Samsung Galaxy Z Fold 6 मध्ये ग्राहकांना S-Pen साठी देखील सपोर्ट दिला आहे.
  • कंपनीने या स्मार्टफोनमध्ये snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला आहे.
  • सॅमसंगचा आगामी फोल्डेबल फोन 6 Android 14 आधारित One UI 6 ऑपरेटिंग सिस्टीम वर चालणार आहे.
  • फोटोग्राफीसाठी या मोबाईल मध्ये 50 MP प्राथमिक कॅमेरा असेल, याशिवाय यात 12 MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 10 MP टेलीफोटो लेन्स असतील.
  • Samsung Galaxy Z fold 6 मध्ये वापरकर्त्याला 4400 mAh बॅटरी मिळेल जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Leave a Comment