जिओ कंपनी ही कायमच आपल्या अनेक नवनवीन योजना आखण्यासाठी प्रसिद्ध आहे, आणि त्यांच्या या योजना सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असतात. काही दिवसापूर्वी, जेव्हा Jio कंपनीने भारतातील काही राज्यांमध्ये 5G इंटरनेट लॉन्च केले होते, तेव्हा Jio च्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. जिओ कंपनी आपल्या परवडणाऱ्या आणि स्वस्त योजनांसाठी खूप लोकप्रिय आहे. देशात करोडो लोक जिओ कंपनीचे सिम वापरतात. 5G इंटरनेट लाँच केल्यानंतर, लोक त्यांचे स्मार्टफोन बदलत आहेत, बहुतेक लोक नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करत आहेत. तर आपणास असाच एक जिओने लाँच करणार असलेल्या स्मार्टफोन बद्दल पाहणार आहोत.
जिओ कंपनीने केली 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा
Jio कंपनीने काही दिवसापूर्वी भारतातील काही राज्यांमध्ये 5G इंटरनेट लॉन्च केले होते. पण आता यानंतर कंपनीने Jio 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. ज्यांना महागडा स्मार्टफोन खरेदी करता येत नाही त्यांच्यासाठी Jio चा हा स्मार्टफोन एक चांगला आणि उत्तम पर्याय आहे.
Jio कंपनीचा स्मार्टफोन फक्त चार्ज होतो 30 मिनिटात
या Jio स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, यात 16-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. या Jio स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh ची उत्तम बॅटरी आहे. ही बॅटरी 33 वॅट फास्ट चार्जरने चार्ज करू शकता. हा स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतील. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर तुम्ही हा फोन 2 दिवस वापरू शकता.
Jio कंपनीच्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स
या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच HD डिस्प्ले आहे, ज्यामध्ये तुम्ही 4K दर्जाचे व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही हा स्मार्टफोन फक्त ₹3000 मध्ये खरेदी करू शकता. भारतात या स्मार्टफोनच्या लॉन्च तारखेबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. लोक अशा स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत असतात. हा फोन लवकरच भारतात लॉन्च होईल अशी अपेक्षा आहे.