ST महामंडळात नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास करू शकतात अर्ज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी नोकऱ्या जाहीर केल्या आहेत. MSRTC मध्ये शिकाऊ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, परिवहन विभागाच्या या रिक्त पदासाठी अर्ज करू शकता.

MSRTC भरतीमधील पोस्टची संख्या आणि  पद :

  • मेकॅनिक (वाहन)६५
  • जागाडिझेल मेकॅनिक६४
  • ऑटोमोटिव्ह बॉडी फिटर२८
  • जागावेल्डर१५
  • इलेक्ट्रिशियन८०
  • टर्नर०२
  • बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग०२

MSRTC पदांकरिता वयोमर्यादा

या पदांसाठी ओपन कॅटेगिरी करिता वय वर्ष 18 ते 30 वर्षां पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.मागासवर्गीय किंवा दलित बांधवांसाठी 18 ते 38 वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.

MSRTC  नोकरी करता  अर्ज शुल्क :

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे एसएससी / आयटीआय किंवा अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.अर्ज करताना, आरक्षित आणि मागासवर्गीय उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.तर, ओपन कॅटेगिरी मधील उमेदवारांसाठी हे शुल्क ५०० रुपये आहे.भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळविण्यासाठी, उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात किंवा वेबसाइटला भेट देऊ शकतात.👇https://msrtc.maharashtra.gov.in

MSRTC शिकाऊ उमेदवार 2024 करता अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनच्या या भरतीतून शिकाऊ उमेदवाराच्या एकूण २५६ पदे भरण्यात येणार आहेत. ज्यामध्ये मोटर मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि टर्नरसह इतर अनेक पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ०६ जून २०२४ आहे. अशा परिस्थितीत या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्वरीत ऑनलाइन अर्ज भरावेत.

अर्ज कसा करावा

  • तुम्हाला प्रथम खाली दिलेली लिंक ओपन करायचे आहे👇 https://msrtc.maharashtra.gov.in
  • ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचे आहे .
  • यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल यामध्ये तुमची मागितलेली सर्व माहिती भरायचे आहे.
  • यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी व कॅपच्या दिला जाईल
  • तो टाकून तुम्ही Apply या बटन वरती क्लिक करायचे आहे.
  • आपला बटन वरती क्लिक केल्यानंतर ,तुम्ही तुम्हाला हवे ते पद निवडून त्यावरती क्लिक करायचे आहे.

Leave a Comment