शेतातील विविध कामासाठी शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करत असतात. सरकारे अश्या शेतकरी बांधवांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु केली आहे. आता गरजू शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत
हे व्यक्ती असतील मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र
- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 23 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहायता बचत गटांना उत्पादनाचे साधन निर्माण होऊन त्यांचे राहणीमान बदलावे या उद्देशाने ही योजना राबवली जाते.
- केवळ अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
योजनेचे लाभाचे स्वरूप
बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु.3.१५ लाखांची आर्थिक मदत.
मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇👇👇👇
लाभासाठी अशा आहेत अटी
- बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- बचत गटातील ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
- सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे दाखले सादर करावेत.
- याआधी यासंबंधीच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने म्हणजेच आवश्यक असणारे साहित्य याच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा रुपये ३.५० लाख इतकी असेल.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत.
- ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.
हेही नक्की वाचा👇👇👇👇
मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र राबविण्याचा उद्देश:-
- या मिनी ट्रॅक्टर योजनेचा उद्देश हा बचत गटांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य लाभावी.
- त्याचप्रमाणे बचत गट ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलीत यंत्र भाड्याने देऊ चांगले उत्पन्न देखील मिळवू शकतात.
- त्याचप्रमाणे याअंतर्गत बचत गटातील सदस्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.
मिनी ट्रॅक्टर योजनेला अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇👇👇👇
मिनी ट्रॅक्टर योजना आवश्यक कागदपत्रे
- बँक पासबुक
- बचत गटाचे घटना पत्र
- बचत गटाच्या कार्यकारणी मधील सदस्यांची मूळ यादी
- बचत गटातील सर्व सदस्यांचा जातीचा दाखला
- कुरा कागदावर फोटो सहित बचत गटाची ओळख पत्र
- आधार कार्ड, पॅन कार्ड