उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे राज्यातील दुधाच्या दरात पुन्हा घसरण is झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन रुपयांनी वाढवलेले दर आता पुन्हा दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे ३.५ टक्के फॅट आणि ८.५ एसएनएफ असलेल्या गाईच्या दुधाचा प्रति लिटर दर २९ रुपयांवरून २७ रुपयांपर्यंत खाली आला आहे.
दुध उत्पादकांना दररोज तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याने आणि शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारसीप्रमाणे ३४ रुपये प्रति लिटर दर न मिळाल्याने संकट वाढले आहे. राज्यात दररोज साधारणपणे दोन ते सव्वादोन कोटी लिटर दूध उत्पादन होते. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई आणि तीव्र उष्णतेमुळे दूध उत्पादनात ३० ते ४० लाख लिटरपर्यंत घट झाली आहे.
दुग्धजन्य पदार्थांना मागणी असतानाही दर कमी!
नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भातील उन्हाळ्यात लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रमांमुळे दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असते. मात्र, याच काळात दर कमी केल्याने शेतकरी पुरते त्रस्त झाले आहेत. गेल्या वर्षी याच काळात दुधाला प्रति लिटर ३५ रुपयांच्या आसपास दर होता.दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी खाजगी दूध संघांच्या मनमानी कारभारावर तीव्र टीका केली आहे. त्यांनी तात्काळ दरात वाढ करण्याची आणि ५ रुपये प्रति लीटर अनुदानात अडथळे दूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दुधाला पाच रुपये अनुदानाची घोषणा कागदोपत्रीच!
राज्यातील बळीराजाच्या शेतमालाला भाव मिळत नाही, त्यात दुधाचे भाव कोसळले. त्यामुळे दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन सुरु केलं. शहरकडचा दूध पुरवठा रोखला गेला, टँकरच्या टँकर दूध रस्त्यावर ओतलं गेलं. यानंतर झोपलेल्या सरकारला जाग आली आणि सरकारने दूध संघाबरोबर बैठका घेतल्या. या बैठकीत पावडर बनवणाऱ्या दूध संस्थांना पाच रुपये अधिकचे अनुदान देण्याची घोषणा सरकरने केली. या घोषणेनुसार 1 ऑगस्टपासून दूध संघांनी शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान द्यायला सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात पहिलं मस्टर म्हणणे 1 ते 10 ऑगस्टसाठी दूध संघांनी दुधावर 5 रुपये अनुदान दिले. पण त्याचा परतावा अजूनही सरकारने दूध संघांना दिला नाही.राज्य सरकारने घोषणा करुनही अजून दूध संघाना पाच रुपये अनुदान दिले नाही, दूध आयुक्तांनी दिलेल्या महितीनुसार, 42 संस्थांना सरकारकडून अनुदान देय आहे. राज्य सरकारला अनुदान देण्यासाठी त्यांनी या दूध संस्थांकडून माहिती मागितली आहे. आतापर्यंत 7 दूध संस्थांनी माहिती दिली. त्यांचे पहिल्या मस्टरचे म्हणजे 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंतच्या दुधाचा 7 कोटी 62 लाख अनुदान परतावा देणं अपेक्षित आहे. पण ते अनुदान अजून देण्यात आलं नाही. त्यामुळे अजून अशा 35 दूध संस्था आहेत, ज्यांना एकही मस्टर अनुदान परतावा मिळाला नाही.
दुधाचे दर कमी करण्यामागे काय कारणे?
दुध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे कारण पुढे करत खरेदीदार आणि दूध संघ दर कमी करत आहेत. यामुळे गेल्या सहा महिन्यांत दूध उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.