मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये खालील ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
- आधार कार्ड,
- मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र,
- बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक,
- कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,
- वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स),
- पॅन कार्ड,
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड,
- पारपत्र (पासपोर्ट),
- निवृत्तीवेतनाची दस्तावेज,
- केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ओळखपत्र,
- पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र,
- संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र,
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे (Matdanasathi Olakpatra Purave) मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.