या देशातील लोक आहेत लग्नाबद्दल उदासीन, म्हणून सरकारच लॉन्च करत आहे डेटिंग ॲप!

आपल्याकडे असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गातूनच बांधल्या जातात. लग्न केल्याने दोन व्यक्तींच्या जीवनातील एकटेपणाही दूर होऊ शकतो. विवाह दोन व्यक्तींमध्ये योग्य वेळी होणे, ही त्या दोन कुटुंबांमधील वैयक्तिक बाब आहे.

पण सध्याच्या परिस्थिती लग्नाच्या बाबतीत अशी झाली आहे की, मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत त्यामुळे त्या अपेक्षांमध्ये मुले बसत नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुलेही विना लग्नाची राहिलेली आहेत.

मात्र, एक असा देश आहे जिथे सरकारच आपल्या नागरिकांचे लग्न लावण्यात स्वारस्य दाखवत आहे. कारण लग्न करण्यामध्ये सध्याच्या युवक आणि युवतींना स्वारास्य राहिलेले नाही त्यामुळे देशाचे भविष्य हे खूपच अंधारात आहे असे सरकारला वाटत आहे. त्यामुळेच सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. म्हणूनच सरकारने या देशामध्ये लग्न करण्यासाठी डेटिंग ॲप्स देखील दोन लोकांना भेटण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. अशी  युक्ती जपान या देशाने आपल्या नागरिकांसाठी शोधून काढली आहे.

या देशाचे सरकार लॉन्च करत आहे डेटिंग ॲप

होय हे अगदी खरे आहे. जपान या देशातील सरकार नागरिकांसाठी नवीन डेटिंग ॲप लाँच करत आहे.

जपानची सरकारी संस्था टोकियो सिटी हॉल ” Tokyo Futari Story” नावाचे असे एक व्यासपीठ युवक आणि युवतींसाठी सुरू करत आहे. “Tokyo Futari Story” म्हणजे दोन लोकांची गोष्ट.

जपानमधील घटत्या विवाहाचे प्रमाण लक्षणीय कमी होत आहे,ही बाब लक्षात घेऊन हे पाऊल उचलले जात आहे. एवढेच नाही तर जपानमधील जन्मदरामध्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी देशातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर मानली आहे.

२०२४ च्या अखेरीस लॉन्च होणार डेटिंग ॲप

जपानमध्ये प्रेमासंबंधी सल्ला आणि सामान्य माहितीसाठी एक वेबसाइट आधीपासूनच कार्यरत आहे. हा जपान सरकारचा प्रकल्प अजूनही बाल्यावस्थेत आहे. म्हणजेच अजूनही सरकार या प्रकल्पावर काम करत आहे म्हणजेच तो अजून पूर्णत्वास गेला नाही.

हे व्यासपीठ २०२४ च्या अखेरीस नागरिकांसाठी खुले होऊ शकते. जपानचे नागरिक स्मार्टफोन आणि वेबच्या माध्यमातून हे डेटिंग ॲप वापरू शकतील.

जपानी लोकांची लग्नाबद्दलची आवड कमी होत आहे

सध्याचा जपानमधील विवाह दर आतापर्यंतचा सर्वात कमी आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये ५,०४,९३०  विवाह झाले. २०२३ मध्ये विवाहांची ही संख्या ४,७४,७१७ पर्यंत कमी झाली

त्याच बरोबर जन्मदर देखील याच कालावधीत ७,७०,७५९ वरून ७,२७,२७७ वर घसरला. जपानमधील या प्रवृत्तीसाठी जास्त कामाचे तास आणि पारंपारिक विवाहांमध्ये लोकांचा कमी रस, लिव्ह इन रिलेशन यासारखे अनेक घटक कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment