निवडणुकीच्या निकालाचा अंदाज येण्यासाठी सर्वांचे लक्ष एक्झिट पोल कडे असते अर्थात एक्झिट पोल आणि एकदा चुकीचेही ठरल्याचे दिसून आले आहेतच पण वेगवेगळ्या संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार देशात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार येईलच असा अंदाज वर्तवण्यात येत आहे परंतु असे असले तरीही महाराष्ट्रात मात्र एनडीए साठी आव्हानात्मक ठरल्याचे चित्र समोर येत आहे कारण महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखाली माय तुला अपेक्षित यश एक्झिट पोल मधून तरी मिळण्याचे दिसून येत नाही.
चारशे नाही पण पावणे चारशेपर्यंत मजल मारून भाजप केंद्रातील सत्ता राखणार आणि इतर प्रमुख सर्व्हेमधून समोर आलं आहे, पण या एक्झिट पोलमुळे राज्यातील भाजपसमोरची चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून भाजपने राज्यात मिशन 45 साठी काम केलं. पण एक्झिट पोलमध्ये मात्र महायुतीचा आकडा हा 22 ते 26 इतका असल्याचं दिसतंय. त्यापैकी भाजपला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे 45 प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात भंगणार का, भाजपच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं ही येत्या 4 जून रोजी मिळणार आहेत.
काय आहे एक्झिट पोल
महाराष्ट्रात महायुतीला 22 ते 26 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 23 ते 24 जागा मिळतील.
या एक्झिट पोलमधली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपला एकूण 17 जागा देण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या स्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शिंदे गटाला 6, अजित पवार गटाला 1, शरद पवार गटाला 6, काँग्रेसला 8 आणि एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोल नुसार निवडून येथील हे खासदार
- सातारा : शशिकांत शिंदे
- सांगली : विशाल पाटील
- कोल्हापूर : शाहू महाराज
- बीड : पंकजा मुंडे
- माढा : धैर्यशील मोहिते पाटील
- बारामती : सुप्रिया सुळे
- नाशिक : राजाभाऊ वाजे (शिवसेना उद्धव ठाकरे)
- दिंडोरी : भास्कर भगरे (शरद पवार)
- धुळे : डॉ. सुभाष भामरे (भाजप)
- जळगाव : स्मिता वाघ (भाजप)
- रावेर : रक्षा खडसे (भाजप)
- अहमदनगर : निलेश लंके
- सिंधुदुर्ग : नारायण राणे
- धाराशिव : ओमराजे निंबाळकर
दोन मोठया पक्षांमधील फूट
शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या महाराष्ट्रामधील पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी .ही सगळ्यात मोठी निवडणूक आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे प्रेडिक्शन करण्यासाठी सगळ्यात कठीण राज्य दाखवले जाते .भाजपला सुद्धा जिथे जोराची ताकद लावावी लागली .पंतप्रधानांच्या 17 सभा झाल्या तरी देखील भाजपला घाम फुटला परंतु यावेळी महाविकास आघाडीची सॉफ्ट लाट असल्याची पाहायला मिळाले त्यामुळे भाजपला जोराची कसरत करावी लागेल.
देश पातळीवरील एक्झिट पोलचा अंदाज
देशपातळीवरचे एक्झिट पोलचा अंदाज पाहिल्यास बहुतेक सगळ्या संस्थांनी पुन्हा एकदा भाजप एनडीएच सरकार येण्याचं अंदाज दिला आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला स्पष्ट बहुत मत मिळण्याचा अंदाज दर्शविण्यात येत आहे तरी भाजपाला त्यांचा 400 पार ची घोषणा मात्र किमान एक्झिट पोलच्या अंदाजावरती तर पूर्ण करता येत नाही असे दिसून येत आहे.