सध्या पशुपालन या व्यवसायाकडे भरपूर तरुणाई वळत आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये पारंपारिक तंत्रज्ञान वापरणे जवळपास अशक्य आहे. म्हणजेच सध्या दुग्ध व्यवसाय हा आधुनिक तंत्रज्ञान वापरूनच केला जात आहे. पशुधनाला गुणवत्ता पूर्ण सेवा मिळवण्यासाठी तसेच आरोग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक माहितीचा लेखाजोखा उपलब्ध व्हावा यासाठी पशुपालकाला केंद्रस्थानी ठेवत दर्जेदार आणि शाश्वत सेवा, शाश्वत आर्थिक संधी आणि सामाजिक सामाजिक स्वास्थ यंत्रणेची गरज लक्षात घेता शासनाने राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम हाती घेतली आहे. पशुपालकाला आपल्या पशुधनाचे पुढे काय होईल याची काळजी पडणे स्वाभाविक आहे. म्हणूनच या तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालकाला या चिंतेतून मुक्त केले जाणार आहे.
लाईव्ह स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एन डी एल एम यंत्रणेत तांत्रिक दृष्ट्या अनेक पातळीवरील माहितीचे संकलन विश्लेषण या डिजिटल यंत्रणेद्वारे केले जाणार आहे.
पशुपालक किंवा शेतकरी यांना माहितीचे आदान-प्रदान, पैशाचे विनिमय अधिक सुलभ होईल अशी संरचना, मुक्त स्त्रोत तंत्रज्ञान, सुलभ प्रमाणके, माहितीची गोपनीयता व साठवणूक यासह तंत्रज्ञ व वापर करता अशा दोघांनाही आतळण्यास सुकर असा डिजिटल प्लॅटफॉर्म हे तांत्रिक प्रारूप आहेत.
दूध व मांस उत्पादक,प्रयोगशाळा व पशुवैद्यकीय दवाखाने, लस पुरवठा यंत्रणा, पशु पैदास व पशु रोग सन नियंत्रण प्रणाली या विविध घटकांकडून प्राप्त माहितीचे कृत्रिम बुद्धिमत्ता व तत्सम तंत्रज्ञानाच्या साह्याने विश्लेषण करण्यात येऊन शासकीय आदरणीतील तंत्रज्ञ व पशुपालक यांच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल.
मोबाईल ॲप्लिकेशन च्या साह्याने पशुपालकांना पशूंची प्राथमिक माहिती आपल्या गोठ्यावर नोंदवणे शक्य होईल. आवश्यक अशा सर्व सेवा जसे की पशुवैद्यकीय सेवा,कृत्रिम रेतन, रेतमात्रा निवड, लसीकरण, पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळा, रोगप्रतिबंधात्मक उपाय योजना, औषध विक्रेता, खरेदी विक्री दर, बाजारपेठ, शेतकरी व उत्पादक कंपनी व सहकारी संघ तपशील इत्यादी माहिती ऑनलाईन पद्धतीने सहज शक्य होईल.
मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे
१. शेतकरी व पशुपालकांना आधुनिक माहिती पायाभूत सुविधा अखंडपणे देणारी एक सक्षम शेतकरी केंद्रित प्रणाली तयार करणे.
२. लाभ हस्तांतर कार्यक्रमासाठी यंत्रणा
३. देश पातळीवरील शेतकरी आणि बाजार यांना जोडून खाजगी क्षेत्राचा सुधारित सहभाग सक्षम करून एक सक्षम राष्ट्रीय बाजारपेठ निर्माण करणे.
४ पशुधन क्षेत्रात सशक्त पशु पैदास व प्रजनन प्रणाली त्याचबरोबर रोग संनियंत्रण कार्यक्रम तयार करणे.
५. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी दर्जेदार वैज्ञानिक संशोधन व विकास कार्यक्रम हाती घेण्यासाठी पशुपालन व संशोधन क्षेत्राची नाळ भक्कम करणे.
६. देशातील विविध राज्यांना त्यांचे स्वतःचे पशुधन कार्यक्रम तयार आणि व्यवस्थापित करण्यास सक्षम प्रणाली विकसित करणे.
पशुपालक किंवा शेतकऱ्यांचा मोहिमेतील सहभाग
राज्यातील सर्व पशूंची डिजिटल लोन करण्यासाठी कानात बारकोडीत बिल्ले मारण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाच्या वतीने हाती घेतली आहे. सर्व पशुपालकांना आपल्या पशुधनाला हे बिल्ले लावून घेणे बंधनकारक आहे. एक जून 2024 नंतर बिल्ले असल्याशिवाय पशुधनाची आठवडी बाजारात बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करता येणार नाही. बिल्ले नसतील तर पशुधनाला पशुवैद्यकीय दवाखाने येथून पशुवैद्यकीय सेवेचा लाभ मिळू शकणार नाही. केंद्र किंवा राज्य सरकारकडून पशुपालकांना देण्यात येणारे आर्थिक साह्य जिल्हा नसेल तर मिळणार नाही.
बऱ्याचदा नैसर्गिक आपत्ती, वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे किंवा विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई मिळत असते, पण आता सरकारने अशी उपाययोजना केली आहे की जर बिल्ला नसेल तर अशी कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही. राज्य अंतर्गत किंवा पर राज्यात जे पशुधनाचे बाजार भरतात त्या वेळच्या पशुधनाच्या वाहतुकीला बिल्ल्याशिवाय परवानगी मिळणार नाही. दिलेल्या शिवाय पशुधन तपासणीसाठी नाक्यावर आढळली तर पशुपालक आणि वाहतूकदार दोघांवर ही नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
थोडक्यात सांगायचे झाले तर बारकोड युक्त बिले म्हणजे पशुधनाचे एक ओळखपत्रच आहे.
मोबाईल ॲप्लिकेशन
समजायला अगदी सुलभ आणि वापरण्यास सोपे असे मोबाईल ॲप्लिकेशन ही आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळातील एक मूलभूत गरज आहे. पशुसंवर्धन क्षेत्र सुद्धा यात आघाडीवर आहे.
“ई- गोपाला”या डिजिटल प्रणालीतून पशुपालक शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सेवा मिळवून देणारा हा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा वापर
पशुधनाची पैदास, रोग नियंत्रण, उत्पादन यासारख्या बाबीसाठी सरकारी आणि खाजगी सेवा क्षेत्रात समतोल साधण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उपयोग सदर डिजिटल मोहिमेत करण्यात आला आहे, जेणेकरून परस्पर समन्वय उत्कृष्ट प्रकारे साधता येईल,
पशुपालकाकडून पशुधनाची संकलित होणाऱ्या माहितीची गोपनीयता, प्रमाणीकरण तसेच पृथःकरण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान,मशीन लर्निंग सारख्या अध्ययवत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. उत्तम दर्जाच्या सेवा रोगावर प्रतिबंधात्मक उपाययोजना,पशुधनाचे दर्जेदार व्यवस्थापन आणि पशु उत्पादनास उपलब्ध होणारी राष्ट्रीय बाजारपेठ अशा अनेक बाबी शक्य होणार आहेत.
या डिजिटल मोहिमेद्वारे शेतकरी व पशुपालक यांना सरकारी मदत किंवा लाभ थेट त्यांच्या खात्यात देणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम
या प्रकल्पांतर्गत भारतातील सुमारे 15 कोटी गाई व म्हशींना पशु आधार क्रमांक (१२ अंकी) असलेले कानातील टॅग लावण्यात आले आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून राष्ट्रीय पशु रोग रिपोर्टिंग यंत्रणा गेल्या दशकापासून कार्यान्वित असून विविध आजारांच्या प्रादुर्भाव बाबत माहिती देत आहे.
राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रम सारखे प्रमुख पैदास व्यवस्थापन कार्यक्रम यांच्या अनुभवाच्या आधारावर राष्ट्रीय पशुधन डिजिटल मोहीम आकारली आहे.
जगभरातील सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाने खूप मोठी प्रगती केली आहे. म्हणूनच पशुधनाचे व्यवस्थापन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाला दुर्लक्ष करून चालणार नाही. यामुळेच केंद्र शासनाने “राष्ट्रीय डिजिटल पशुधन मोहीम”हाती घेतले आहे.
भारत पशुधन या नावाने ओळखला जाणाऱ्या प्रणालीत सर्व पशुधनाच्या जन्ममृत्यू,आरोग्य, मालकी हक्क या बाबींच्या नोंदी डिजिटल यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहेत.
पशुधनाच्या सर्व मूलभूत नोंदी ठेवण्यासाठी बारकोड युक्त बिले जनावरांच्या कानात मारण्यात आले आहेत. या किल्ल्यावरील बारकोड ला संबंधित जनावरांची माहिती भारत पशुधन प्रणालीने जोडली जाणार असून यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यातर्फे पशुधनावर करण्यात येणाऱ्या औषध उपचाराची नोंद होणार आहे.
लसीकरण प्रजनन खरेदी-विक्री अशा महत्त्वपूर्ण नोंदी या प्रणालीत होणार असल्याने विविध भागात पशुधनावर करण्यात येणाऱ्या उपचार दरम्यान वापरण्यात आलेल्या औषधे विचारात घेऊन सदर भागात संभाव्यसाठीच्या आजाराच्या शक्यतेचा अंदाज किंवा अस्तित्वात असलेल्या आजाराच्या स्थितीबद्दल आगाऊ माहिती उपलब्ध होऊ शकेल, त्यामुळे वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना सहज शक्य होईल. जीवितहानी तसेच पशुधनापासून मिळणारे उत्पन्नावरील विपरीत परिणाम टाळणे शक्य होईल.