सर्वात प्रथम अर्जदाराला वरील बटन वर क्लिक करून नवीन अर्जदार नोंदणी हा पर्याय निवडून रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल.
आता युजर नेम आणि पासवर्ड किंवा आधारकार्ड ओटीपी टाकून लॉगीन करायचं आहे.
लॉगीन केल्यानंतर अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करा. आता तुम्हाला विविध प्रकारच्या योजना दिसत असेल.
कडबा कुट्टी अनुदान योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषि यांत्रिकीकरण या योजनेवर क्लिक करावे लागेल. आता कृषि यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज ओपन झालेला दिसेल.
त्यामध्ये तुम्ही कृषि यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला कडबाकुट्टी नावाचा ऑप्शन निवडावा लागेल.
जर तुम्हाला मानवचलित यंत्र हवे असेल तर मानवचलित यंत्र अनुदान ऑप्शनवर क्लिक करा. जर तुम्हाला ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रिक कडबा कुट्टी यंत्र हवे असेल तर ट्रॅक्टरचलित अवजारे या ऑप्शनवर क्लिक करा.
ट्रॅक्टरचलित कुट्टी योजनेसाठी अर्जदाराकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला अर्ज जतन करा वर क्लिक करायचे आहे.
आता तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
अर्ज करण्यासाठी पेमेंट ऑनलाईन करावे लागेल. पेमेंट केल्यावर त्यासंबंधीचा एसएमएस तुमच्या मोबाईलवर तुम्हाला प्राप्त होईल.
योजनेसाठी निवड झाल्यावर तुम्हाला त्यासंदर्भातील एसएमएस प्राप्त होईल.
यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र देण्यात येईल त्यानंतर तुम्हाला आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहे.
त्यानंतर मशीन खरेदी करून अनुदानाची मागणी तुम्हाला करावी लागेल.
कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा👇