आता कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी मिळणार 20,000 रूपयांपर्यंतचे अनुदान: कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतीला पूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्याकरिता शेतकरी शेती व्यवसायाबरोबर गाई, म्हशी, शेळी, मेंढी, गुरे-ढोरे पालन करत असतो. आजही मोठ्या प्रमाणात पशु पालन व्यवसाय ग्रामीण भागात केला जातो. ज्या शेतकऱ्यांकडे गायी, म्हशी व इतर जनावरे आहेत अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याची व  पाण्याची व्यवस्था करावी लागते.

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇👇

kadba kutti machine yojana
पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण जास्त जनावरे असतील तर त्यांना जास्त चारा द्यावा लागतो, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांचा चारा आपण कापून देऊ शकत नाही. त्यामुळे जर आपल्याकडे कडबा कुट्टी मशीन असेल तर आपण कडब्याचे कमी वेळेत बारीक-बारीक तुकडे करून घेऊ शकतो. कडबा कुट्टी मशिनमुळे शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कमी होऊन जास्तीत जास्त प्रमाणात जनावरांना पशु खाद्य मिळू शकते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायात अधिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते.

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा 👇👇

कडबा बारीक केल्यामुळे जनावरांना खाण्यासाठी सोयीस्कर होतो. मोठा कडबा अगदी कमी वेळेत बारीक कापला जातो. कडबा बारीक केल्यामुळे कमी जागेत साठवणूक करता येते. शेतकऱ्यांचे शारीरिक कष्ट कमी होते व जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते. चाऱ्याची नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करता येते.

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇👇

कडबा कुट्टी अनुदान योजना
राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता त्यांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करणे शक्य नसते. म्हणून याचा विचार करता महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कडबा कुट्टी यंत्र (चाफ कटर मशीन) अनुदान योजना राज्यात राबविली जात आहे. शेतकऱ्यांना शासनामार्फत कडबा कुट्टी यंत्र खरेदी करण्यासाठी यंत्र किंमतीच्या 50 टक्के अनुदान किंवा 20 हजार अनुदान देण्यात येते. ही योजना शेतकऱ्यांना अतिशय फायद्याची ठरत आहे अनेक शेतकरी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. कडबा कुट्टी मशीन योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. या लेखात आपण योजनेसाठी असणारी पात्रता, आवश्यक असलेली कागदपत्रे, योजनेच्या अटी व शर्ती याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

हेही नक्की वाचा :

कडबा कुट्टी मशीन योजनेचे उद्देश

Kadba Kutti Machine Yojana 2024 Purpose

  • राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना 50% अनुदानावर कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करून देणे हा या योजनेअंतर्गत सरकारचा मुख्य मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांना पशुपालन कार्यात तेजी निर्माण करून देणे.
  • शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कडबा कुट्टी मशीन योजनेची वैशिष्ट्ये

Kadba Kutti Machine Yojana Features

  • Kadba Kutti Machine Yojana कडबा कुट्टी मशीन अंतर्गत शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुपालन करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान वापराच्या गोष्टी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
  • Kadba Kutti Machine Yojana या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी लाभाची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • Kadba Kutti Machine Yojana या योजनेत शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन घेण्यासाठी सरकारमार्फत 50% रक्कम अनुदान स्वरूपात मिळेल

कडबा कुट्टी मशीन साठी अर्ज करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 👇👇

कडबा कुट्टी मशीन योजनेचे लाभार्थी

Kadba Kutti Machine Subsidy 2024 Benefisior

कडबा कुट्टी मशीन योजनेचा Kadba Kutti Machine Subsidyलाभ हा राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक यांना होणार आहे.

Kadba Kutti Machine Yojana Eligibility

  • कडबा कुट्टी मशीन योजनेचा Kadba Kutti Machine Scheme  लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे बंधनकारक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • ग्रामीण भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे जनावर (पशु) असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराजवळ कमीत कमी दोन जनावरे असणे बंधनकारक आहे.
  • ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी कडबा कुट्टी मशीन योजनेचा Kadba Kutti Machine Scheme  लाभ घेतलेला आहे अशा लाभार्थ्यांना पुन्हा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • लाभार्थ्याने जर या योजनेअंतर्गत कडबा कुट्टी मशीन घेतले असेल तर त्याला ती मशीन विकता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ हा मुंबई व मुंबई उपनगर मध्ये असलेल्या नागरिकांना घेता येणार नाही. या योजनेतून त्यांना वगळून टाकण्यात आलेले आहे

कडबा कुट्टी मशीन योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे

Kadba Kutti Machine Anudaan Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे रहिवाशी प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे बँक खाते पासबुक
  • अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र
  • कडबा कुट्टी मशीन खरेदीचे बिल

1 thought on “आता कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी मिळणार 20,000 रूपयांपर्यंतचे अनुदान: कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना”

Leave a Comment