मोफत पिठाची गिरणी योजना साठी पात्रता ,आवश्यक कागदपत्रे व अर्ज करण्याची प्रक्रिया

पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता काय असणार आहे?

  • तर मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील महिलांना पात्र मानले जाते.
  • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज करणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी हवी.
  • अनुसूचित जातीच्या महिलांना या योजनेसाठी पात्र मानले जाते.
  • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी केवळ आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांनाच पात्र मानले जाते.
  • मोफत पीठ गिरणीचा लाभ फक्त ग्रामीण भागातील महिलाच घेऊ शकतात.
  • मोफत पेट गिरणीचा लाभ फक्त 18 ते 60 वयोगटातील महिलाच घेऊ शकतात याच महिलांना फक्त पात्र मानले जाईल.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाख ते वीस हजार रुपये पेक्षा कमी आहे अशा महिलांनाच फक्त या योजनेसाठी पात्र मांडले जाते.

मोफत पीठ गिरणी योजनेसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतील

  • आधार कार्ड
  • SC/ ST संबंधित जात प्रमाणपत्र
  • पिवळे किंवा भगव्या रेशन कार्ड
  • योजनेच्या उपयोगीता व कार्य प्रदर्शनीशी संबंधित स्व-लिखित अहवाल पत्र द्यावे लागेल
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
  • दहा अंकी मोबाईल क्रमांक
  • या योजनेप्रमाणे इतर कोणत्याही योजनेचा लाभ न घेण्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल

मोफत पिठाच्या गिरणी साठी अर्ज कसा करावा?

जर तुम्हालाही योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या डाउनलोड बटन वरती क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करावी लागेल या पीडीएफ ची झेरॉक्स काढा

किंवा हा अर्ज तुम्हाला जिल्हा परिषद कार्यालयातील मिळू शकतो. या अर्जामध्ये दिलेली माहिती तुम्हाला स्पष्ट अक्षरांमध्ये लिहायची आहे अर्ज भरल्यानंतर अर्जामध्ये रंगीत पासपोर्ट फोटो चिटकवा त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला आधार कार्ड, SC/ ST संबंधित जात प्रमाणपत्र, पिवळे किंवा भगव्या रेशन कार्ड जावे लागेल हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला हा अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा करावा लागेल.

तर अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा केल्यानंतर अर्जाची पाहणी करण्यात येईल संपूर्ण माहिती तपासल्यानंतर ते जर माहिती तुम्ही योग्य भरली असेल तर तुम्हाला मोफत गिरणी योजनेचा लाभ घेता येईल या अनुदानाची रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये दिली जाईल किंवा तुम्हाला पिठाची गिरणी ही मिळू शकते.

या योजनेचे अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळील जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती घेऊ शकता. हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Comment