महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या मोठ्या उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त ?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीने 30, महायुतीने 17, आणि अपक्ष उमेदवाराने 1 जागा जिंकल्या आहेत. एससी आणि एसटी गटातील उमेदवारांना रुपये जमा करावे लागले. लोकसभा निवडणुकीसाठी 25,000 रु. चंद्रहार पाटील, शांतीगिरी महाराज यांच्यासह अनेक उमेदवारांचे विविध मतदारसंघात डिपॉझिट जप्त करण्यात आले.

लोकसभेच्या रणधुमाळीत अनेक नवख्या उमेदवारांसह मातब्बर नेत्यांनीही निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावले. यामध्ये काही जणांना यश मिळाले तर काहीना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. निवडणुकीसाठी उमेदवाराला ठराविक रक्कम ही डिपॉझिट म्हणून जमा करावी लागते. यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातून अर्ज भरण्यासाठी २५ हजार रुपये तर एससी, एसटी गटातील उमेदवारांना १२ हजार ५०० रुपये डिपॉझिट जमा करावे लागते. उमेदवारांचे डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना एकूण वैध मतांच्या १/६ म्हणजेच १६.६६ टक्के मत मिळवणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊ महाराष्ट्रातील कोण कोणत्या नेत्यांची डिपॉझिट जप्त झाले आहे.

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात ११२१ उमेदवार रिंगणात होते यापैकी १०२५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.

पुणे मतदारसंघ

पुणे मतदार संघामध्ये तीन प्रमुख उमेदवार म्हणजेच भाजपचे मुरलीधर मोहोळ ,काँग्रेसचे रवींद्र धांगेकर व वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे असे तिरंगी लढत लागली होती पण यामध्ये वंचितच्या उमेदवारांमधला डिपॉझिट जप्त होणारा चर्चेतला पहिला चेहरा म्हणजे पुण्याचे वसंत मोरे. ते सोशल मीडियावरून नेहमी चर्चेत असतात. तसेच पुण्यातही त्यांची चांगली चर्चा असते. वसंत मोरे राज ठाकरेंचे कट्टर समर्थक होते. ते पुण्यात मनसेचे पदाधिकारीही होते. पण, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांनी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का याची चाचपणी केली. पण, पुण्याची जागा काँग्रेसला सुटली आणि रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिली. वसंत मोरे चर्चेतला चेहरा असल्यानं भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होईल अशी चर्चा रंगली. पण, वसंत मोरे फक्त तिसऱ्या स्थानापर्यंत उडी मारू शकले. इतकंच नाहीतर या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं. त्यांना 50 हजार मतांचा आकडाही गाठता आला. फक्त 32 हजार मतांवर समाधान मानावं लागलं.

सांगली मतदारसंघ

सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्यासह अठरा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये टिपू सुलतान सिकंदर, आनंदा शंकर नालगे, महेश यशवंत खराडे, पांडुरंग रावसाहेब भोसले, सतीश लतिता कृष्णा कदम, अजित धनाजी खंडादे, अल्लाउद्दीन हयातचांद काजी, डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर, जालिंधर मच्छिंद्र ठोमके, तोहीद इलाही मोमीन, दत्तात्रय पंडित पाटील, नानासाो बाळासाो बंडगर, रवींद्र चंदर सोलनकर, शशिकांत गौतम देशमुख, सुवर्णा सुधाकर गायकवाड, संग्राम राजाराम मोरे. असा एकूण 18 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना मात देत तब्बल एक लाख एकवीस हजार मतांनी आघाडी घेतली आहे. एक ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला आहे. ते सांगली जिल्ह्याकरिता अपक्ष उमेदवार होते.

पंजाबराव डख यांचंही डिपॉझिट जप्त

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख परभणी लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरले होते. त्यांना वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारी दिली होती. आपली शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता असल्यानं विजय आपलाच होईल, असा दावा पंजाबराव डख करत होते. तसेच शेतकऱ्यांमध्ये चांगली ओळख असल्यानं आणि ते मराठा चेहरा असल्यानं पंजाबराव डख महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचं ‘राजकीय हवामान’ बिघडवणार का? अशी चर्चा होती. पण, प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा विजयाचा दावा करणाऱ्या डख यांना लाखभर मतं सुद्धा घेता आली नाहीत. परभणीकरांनी फक्त विजयी उमेदवार संजय जाधव आणि महादेव जानकर यांचं डिपॉझिट सुरक्षित ठेवलं आहे. पंजाबराव डख यांच्यासह तब्बल 31 उमेदवारांच डिपॉझिट जप्त झालं आहे.

नाशिक मतदारसंघ

नाशिक मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांच्या सह २९ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे यामध्ये अरुण काळे, अमोल कांबळे, कमलाकर गायकवाड, करण गायकर, कांतिलाल जाधव, कैलाश चव्हाण, जयश्री पाटील, अॅड. झुंजार आव्हाड, दर्शन मेढे, भाग्यश्री अडसूळ, यशवंत पारधी, वामन सांगळे, अरिफ मन्सुरी, कनोजे गिरधारी, कोळप्पा धोत्रे, गणेश बोरस्ते, चंद्रकांत ठाकूर, चंद्रभान पूरकर, जितेंद्र भाभे, तिलोत्तमा जगताप, दीपक गायकवाड, देवीदास सरकटे, धनाजी टोपले, शांतिगिरी महाराज, सचिनराजे देवरे, सिद्धेश्वरानंद सरस्वती, सुधीर देशमुख, सुषमा गोराणे, सोपान सोमवंशी.

शिर्डी मतदारसंघ

शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांच्या सह ३३ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे

Leave a Comment