सोशल मीडियावर सध्या Ghibli स्टाइल फोटोंचा ट्रेंड जोरदार गाजत आहे. जपानी अॅनिमेशन स्टुडियो Studio Ghibli च्या प्रेरणेने हे फोटो स्वप्नवत, निसर्गरम्य आणि कलात्मक दिसतात. पण तुम्हीही असे फोटो सहज तयार करू शकता! चला, या अनोख्या शैलीत तुमचे फोटो कसे बदलायचे ते पाहूया.
Ghibli स्टाइल म्हणजे काय?
Studio Ghibli हे 1985 मध्ये स्थापन झालेले अॅनिमेशन स्टुडियो आहे, ज्याच्या चित्रपटांमध्ये सॉफ्ट रंग, निसर्गरम्य दृश्ये आणि हृदयस्पर्शी कथानक असते. AI च्या मदतीने आता हे फोटोंवर लागू करता येते, ज्यामुळे फोटो जणू Ghibli च्या जादुई दुनियेत जातात.
AI च्या मदतीने Ghibli फोटो कसा तयार कराल?
आज अनेक AI टूल्स उपलब्ध आहेत जे तुमचे फोटो Ghibli स्टाइलमध्ये मोफत रूपांतरित करू शकतात:
1.Grok AI (xAI)
- खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा…
- तुमचा फोटो अपलोड करा व “Convert photo into ghibli style” अशी टेक्स्ट टाका
- AI प्रक्रिया सुरू होईल आणि काही सेकंदांत फोटो तयार होईल.
- तयार झालेला फोटो डाउनलोड करा आणि शेअर करा !
2.Fotor (fotor.com)
- खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा…
- “Apply Ghibli Filter Now” निवडा.
- फोटो अपलोड करा, फिल्टर लागू करा आणि डाउनलोड करा.
3 .insMind (insmind.com)
- खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा…
- Upload a Photo” वर क्लिक करा, “Ghibli Filter” निवडा आणि फोटो जादूई शैलीत बदला.
4.Artbreeder (artbreeder.com)
- खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा…
- फोटो अपलोड करून रंग, तपशील संपादित करण्याची संधी.
परिपूर्ण Ghibli फोटोसाठी टिप्स
- उच्च-गुणवत्तेचे फोटो वापरा.
- निसर्गप्रधान, स्वप्नवत दृश्ये अधिक प्रभावी दिसतात.
- प्रॉम्प्ट्स वापरून कल्पनाशक्तीला वाव द्या, उदा. “A magical village under cherry blossoms in Studio Ghibli style.”
- विविध AI साइट्स वापरून प्रयोग करा.
Ghibli ट्रेंड का गाजतोय?
AI च्या प्रगतीमुळे आता कोणीही आपले फोटो Ghibli स्टाइलमध्ये बदलू शकतो. इंस्टाग्राम, X आणि टिकटॉकवर #GhibliTrend हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्हीही या ट्रेंडमध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या फोटोंना एक जादुई लुक द्या!