शेतकऱ्यांना आता सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी “फार्मर आयडी” (Farmer ID) देण्यास सुरुवात झाली आहे. आधार क्रमांक आणि पॅनकार्डप्रमाणेच हा शेतकरी ओळख क्रमांक महत्त्वाचा ठरणार आहे. राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजने अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
तुम्ही फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे का? तुमच्या आयडीचा स्टेटस काय आहे? ते कसे तपासायचे? या सर्व माहितीसाठी पुढील माहिती वाचा.
तुमच्या फार्मर आयडी चा स्टेटस चेक करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा…
फार्मर आयडी म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय?
“फार्मर आयडी” हा एक विशेष ओळख क्रमांक आहे, जो शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक, बँक खाते, आणि शेतीविषयक संपूर्ण माहितीशी लिंक असेल. यामुळे सरकारी योजनांचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल.
तुमच्या फार्मर आयडी चा स्टेटस चेक करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा…
या योजनेचे फायदे:
✅ सरकारी योजनांचा लाभ थेट खात्यात जमा होईल.
✅ मध्यस्थांची भूमिका कमी होईल.
✅ PM किसान योजनेसाठी वेगळी पडताळणी करावी लागणार नाही.
✅ वारंवार KYC करायची गरज नाही.
फार्मर आयडी स्टेटस कसे चेक करावे?
जर तुम्ही फार्मर आयडीसाठी नोंदणी केली असेल, पण तुमच्या मोबाईलवर आयडी नंबरचा मेसेज आला नसेल, तर तुम्ही खालील पद्धतीने तुमचा आयडी स्टेटस तपासू शकता:
स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया:
1⃣ खालील बटणावर क्लिक करा…
2️⃣ तुम्हाला दोन पर्याय दिसतील:
- Enrollment ID
- Aadhaar Number
3️⃣ तुमच्याकडे असलेल्या माहितीप्रमाणे योग्य पर्याय निवडा आणि पुढे जा.
4️⃣ नंबर टाका आणि “Check” बटणावर क्लिक करा.
5️⃣ तुमच्या अर्जाची स्थिती पाहा:
- “Pending” – म्हणजे तुमचा अर्ज अद्याप प्रक्रियेत आहे.
- “Approved” – म्हणजे तुमचा ११ अंकी फार्मर आयडी मिळाला आहे.
तुमच्या फार्मर आयडी चा स्टेटस चेक करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा…
फार्मर आयडी का आवश्यक आहे?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा ओळख क्रमांक भविष्यात अनेक योजनांसाठी अनिवार्य होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करणे आणि तुमचा आयडी नंबर मिळालाय का हे तपासणे गरजेचे आहे.
अद्याप नोंदणी केली नसेल?
तर लवकरात लवकर नावनोंदणी करा आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवा!