देशातील सर्व नागरिकांना त्यांचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. तसे न केल्यास त्यांना आर्थिक दंडाला सामोरे जावे लागू शकते. असे वारंवार सांगूनही अनेकांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक केले नाही.अनेक वेळा आयकर विभागाने मुदतवाढ पण दिली होती. त्यामुळे पॅन-आधार लिंक करण्यासाठी आयकर विभागाने ३१ मे २०२४ पर्यंत वेळ दिला होता. या तारखेपर्यंत पॅन आधार लिंक केले नाही तर दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय आयकर विभागाने घेतला आहे.
याचा अर्थ असा की जर तुम्ही तुमचा परमनंट अकाउंट नंबर (PAN) आधारशी लिंक केला नसेल तर तुम्ही आधी हे करणे बंधनकारक होते. जर आयकर विभागाने ३१ मे नंतर तुम्हाला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली तर तुम्ही आधार कार्ड ची पॅन कार्ड दंड भरून लिंक करू शकता. पण जर तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड शी जोडले गेले आहे की नाही या संभ्रमात असल्यास, तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) सहज तपासू शकता. चला तर मग पाहूया की एसएमएस द्वारे तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे की नाही हे कसे पाहायचे…
एसएमएस द्वारे असे तपासा तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे का नाही?
१. तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या एसएमएसवर जाऊन UIDPAN टाइप करावे लागेल.
२. UIDPAN नंतर, तुम्हाला स्पेस देऊन तुम्हाला 12 अंकी आधार क्रमांक आणि 10 अंकी पॅन क्रमांक लिहावा लागेल.
३. तुम्हाला हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवायचा आहे.
४. त्यानंतर तुम्हाला रिप्लाय म्हणून पॅन-आधार लिंक पुष्टीकरणाचा संदेश मिळेल.
ऑनलाइन पद्धतीने असे करा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक?
३१ मे २०२४ नंतर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केले नसेल तर तुम्ही तुमच्या कागदपत्रांमध्ये म्हणजेच पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस ही आयकर विभागाच्या पुढील सूचनेवर अवलंबून असेल.
त्यामुळे जर का आयकर विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली तर तुम्ही खाली दिलेल्या प्रोसेस प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करू शकता.
१. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. https://eportal.incometax.gov.in किंवा https://incometaxindiaefiling.gov.in
२. तुम्हाला सर्वप्रथम येथे नोंदणी करावी लागेल.
३. यानंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक भरा.
३. आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला यूजर आयडी, पासवर्ड आणि तुमच्या जन्मतारखेचा तपशील द्यावा लागेल.
४. स्क्रीनवर दिसणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ‘क्विक लिंक्स’ निवडावे लागतील.
५. यानंतर आधार वर क्लिक करा आणि पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक टाइप करा.
६. आता चेकबॉक्स निवडा आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
७. यानंतर तुम्हाला आधार-पॅन लिंक करण्याचे कन्फर्मेशन दाखवले जाईल.
त्याचबरोबर तुम्हाला हे पण माहित असणे गरजेचे आहे की, जर आधार कार्ड आणि पॅन कार्डचे तपशील वेगळे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला आधार आणि पॅन कार्डचे तपशील अपडेट करावे लागतील.
वरील माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक आहे की नाही हे एसएमएस द्वारे पाहू शकता. त्याचबरोबर जर आयकर विभागाकडून आधार कार्ड ची पॅन कार्ड लिंक करण्याची पुढील सूचना मिळाली,तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही तुमच्या आधार कार्ड पॅन कार्ड ची लिंक करू शकता.