अर्जुनपूर गावात राहणार्या एका सामान्य व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही माहिती मिळताच खातेदारासह बँक व्यवस्थापकांना मोठा धक्का बसला. भानू प्रकाश हा एक साधारण शेतकरी आहे.
बँक ऑफ बडोदा ग्रामीण बँकेत त्याचे सेविंग अकाउंट आहे. भानू प्रतापने बँकेकडून लोन देखील घेतले होते पण, अचानक त्याच्या खात्यामध्ये 99 अब्ज रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली. भानुप्रकाशच्या केसीसी खात्यातील थकबाकीमुळे हा प्रकार घडल्याचे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. गुरुवार दिनांक 16 मे रोजी अचानक त्याच्या खात्यात 99999495999.99(99 अब्ज 99 कोटी 94 लाख 95 हजार 999 )रुपये रक्कम आली. इतकी मोठी रक्कम अचानक जमा झाल्यामुळे बँक कर्मचारी देखील चक्रावले.
या सर्व घटनेची माहिती भानुप्रकाश यांना मिळतात त्यांनी बँकेकडे धाव बँक कर्मचाऱ्यांनी या घटनेची त्यांच्याकडे चौकशी करताना त्यांनी ,हे पैसे कोठून आले आहेत. हे माहिती नसल्याची त्यांनी सांगितले त्यानंतर बँकेतर्फे त्यांचे खाते ठराविक कालावधीसाठी होल्ड वर ठेवण्यात आलेले आहे. या सर्व घटनेची चौकशी करत असताना बँकेची मॅनेजर आशिष तिवारी यांनी असे ,सांगितले की शेतकरी भानुप्रताप यांचे केसेसी खाते आहे. त्यांनी त्यांच्या शेती वरती दहा लाख रुपये कर्ज घेतले होते . कर्जाची परतफेड न केल्यास त्यांचे खाते डिफॉल्टर होणार होते. पण तितक्यातच दुसरीकडे ह्या प्रकरणाची माहिती मिळताच लोकांमध्ये याबाबत चर्चा होताना दिसली.