शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची जलद गतीने व पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी व्हावी आणि शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनांचा (Government Scheme) लाभ एकाच पोर्टलद्वारे देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी (MhaDBT) संकेतस्थळ विकसित केले आहे. याच संकेतस्थळाच्या माध्यमातून बारामती परिसरातील ३ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ (Farmer Scheme) या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत ‘महाडीबीटी’ पोर्टल ही एकात्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली आहे. त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि एकसूत्रता आलेली आहे. बारामती कृषी उपविभागांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या ४ तालुक्यांचा समावेश होतो. 2023-24 मध्ये यंत्र-अवजारे, ट्रॅक्टर, अवजारे बँक, कांदाचाळ, शेटनेट, प्लॅस्टिक पेपर मल्चिंग, ठिबक सिंचन या घटकांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी ३ हजार ८०९ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात १४ कोटी २९ लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वितरण (Subsidy Distribution)करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाडीबीटी पोर्टलवरील कृषी विभागाच्या विविध योजना कृषी विभागाच्या ‘महाडीबीटी’ पोर्टलवर पंतप्रधान कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिके, तेलबिया पिके आणि वाणिज्य पिके तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आदी योजनांचा लाभ देण्यासाठी अर्ज करता येतो.
शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महाडीबीटी’ पोर्टलचे http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरून स्वतःच्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सुविधा केंद्र व ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून अर्ज करता येतात. त्यानंतर तालुक्यातील सर्व अर्जाची एकत्रित संगणकीय सोडत काढण्यात येते. संगणक सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर लघू संदेशाद्वारे कळविले जाते.
महाडीबीटी शेतकरी योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:-
- या योजनेंतर्गत शेतकरी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भरू शकतात.
- प्रायोजित कृषी योजनांची माहिती ऑनलाइन माध्यमातून कुठेही मिळू शकते,
- शेतकरी त्यांचा अर्ज आयडी टाकून स्वतःच्या अर्जाची स्थिती पाहू/मागोवा घेऊ शकतात,
- सहाय्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि सुलभ पडताळणीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म
- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पारदर्शकता,
- अर्जदारांना अर्ज प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर एसएमएस आणि ईमेल सूचना प्राप्त होतील,
- नोंदणीकृत अर्जदारांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात लाभांचे थेट वितरण,
- मंजूर प्राधिकरणासाठी अर्ज प्रक्रियेची सुलभ मान्यता,
- भूमिकेवर आधारित अद्वितीय लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे
- शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपकरणे बसवण्यात येणार आहेत.
- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेती क्षेत्राची माती सुधारू शकतो. यामुळे पिके चांगली वाढण्यास आणि अधिक सुपीक होण्यास मदत होईल.
- ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी घेण्यास मदत करण्यासाठी आणि त्यांना कापणीची चांगली उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उपकरणे उपलब्ध करून देईल.
- ही योजना शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना स्वावलंबी बनविण्यास मदत करेल.
कसा कराल अर्ज?
- शेतीसंबंधी सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. यामध्ये ‘शेतकरी योजना’ (farmer scheme) हा पर्याय निवडावा.
- सर्व योजनांपैकी आपल्याला ज्या योजनेचा लाभ हवा आहे त्याचा अर्जामध्ये समावेश करायचा आहे.
- शेतकऱ्यांनी अर्ज करताना २० रुपये शुल्क व ३.६० रुपये जीएसटी मिळून एकूण २३ रुपये ६० पैसे ऑनलाइन शुल्क भरायचे आहे. त्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाईल.
- ‘वैयक्तीक लाभार्थी’ म्हणून अर्ज करणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर लिंक करावा. आधार प्रमाणित केल्याशिवाय त्यांना अनुदान देता येणार नाही.
- शेतकऱ्यांनी शेती निगडित विविध बाबींसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. आधी अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत होती. ती मुदत आता 11 जानेवारी 2025पर्यंत वाढविण्यात आली आहे. आधी माहिती सादर केलेल्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र, लाभाच्या घटकांमध्ये शेतकऱ्यांना बदल करता येणार आहे. अर्ज करण्याची संधी असल्याने कृषिविषयक योजनांचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी मुदतीपर्यंत अर्ज करू शकतील.
महा डीबीटी फार्मर अॅपद्वारे ऑनलाईन अर्ज कसा करायचा ?
तुमच्या मोबाईल मध्ये गुगल मधून महाडीबीटी फार्मर ॲप डाऊनलोड करायचे आहे. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर हे ॲप ओपन करून सुरुवातीला तुम्ही लॉगिन करत असाल करणे तर तुमच्याकडे वापर करता आयडी आणि पासवर्ड असणे गरजेचे आहे हे नसल्यास तुम्हाला आधी नोंदणी करावी लागेल तेव्हाच तुम्ही लॉगिन करू शकता लॉगिन करण्यासाठी तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून किंवा वापर करता आयडी टाकून लॉगिन करू शकता त्यानंतर तुम्ही कोणत्याही अर्जासाठी या ॲपद्वारे अर्ज सादर करू शकता या ॲपमध्ये तुम्ही अर्ज केलेल्या अर्जाचा तपशील पाहू शकता. अशाप्रकारे तुम्ही महाडीबीटी फार्मर ॲप वापरून अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता.