पीएम आवास योजना अधिकृत संकेतस्थळाद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) अंतर्गत घरकुलासाठी अर्ज प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे.खाली या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
१. खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा👇👇:
त्यानंतर होम पेजवरील “Citizen Assessment” पर्यायावर क्लिक करा.
२. पात्रता निवडा:
आपले वयोगट व उत्पन्नाच्या वर्गानुसार योग्य पर्याय निवडा:
For Slum Dwellers (झोपडपट्टीवासीयांसाठी)
Benefit Under Other 3 Components (इतर घटकांसाठी लाभ)
३. आधार क्रमांक भरा:
आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि “Check” बटणावर क्लिक करा.
आधार पडताळणी झाल्यानंतर पुढील पान उघडेल.
४. माहिती भरा:
आपले वैयक्तिक तपशील भरा:
नाव
वडिलांचे/पतीचे नाव
संपर्क क्रमांक
कुटुंबातील सदस्यांची संख्या
वार्षिक उत्पन्न
पत्ता आणि घराबाबतची आवश्यक माहिती भरावी.
५. बँक खाते आणि कर्जाची माहिती भरा:
बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड द्या.
जर कर्ज घेतले असेल तर संबंधित माहिती जोडा.
६. डॉक्युमेंट्स अपलोड करा:
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी:
आधार कार्ड
रहिवास प्रमाणपत्र
आर्थिक उत्पन्न प्रमाणपत्र
घराचा प्लॅन/नकाशा
बँक खाते तपशील
७. फीस भरा:
अर्ज प्रक्रिया पूर्ण करताना संबंधित अर्ज शुल्क ऑनलाईन भरावे.
८. प्राप्ती पत्रक मिळवा:
अर्ज यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक मिळेल.
हा अर्ज क्रमांक भविष्यातील संवादासाठी सुरक्षित ठेवा.
अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया:
1. पडताळणी:
प्रशासनाकडून कागदपत्रांची आणि पात्रतेची पडताळणी केली जाते.
2. निधी मंजुरी:
योग्य अर्जदारांना निधी मंजूर होऊन तो थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतो.
या योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा👇👇
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):
१. अर्ज प्रक्रिया किती वेळ घेते?
कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर ६-८ आठवड्यांत निधी मंजूर होतो.
२. अर्ज केल्यावर अर्जाची स्थिती कशी तपासावी?
संकेतस्थळावर “Track Your Assessment Status” पर्यायावर क्लिक करा. अर्ज क्रमांक वापरून स्थिती तपासा.
३. अर्ज शुल्क किती आहे?
अर्ज शुल्क नाममात्र आहे, आणि ते अर्जाच्या प्रकारावर अवलंबून असते.