Pipeline Anudan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी शासन या योजना राबवते. शेतकऱ्यांना विविध बाबींसाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सिंचनासाठी देखील शासनाकडून वेगवेगळ्या बाबींसाठी अनुदान दिले जात आहे.
शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी देखील अनुदान मिळते. शेतकऱ्यांना पाईपलाईन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीव्हीसी पाईप साठी तसेच एचडीपीएसाठी अनुदान दिले जाते. खरंतर शेतीमधून जर शाश्वत उत्पादन मिळवायचे असेल तर पाण्याची आवश्यकता असते
पाईपलाईन अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा👇👇
अनेक शेतकऱ्यांना मात्र पाण्यासाठी पाईपलाईन करण्याची गरज भासते. मात्र पाईपलाईन करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे भांडवल नसते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून पाईपलाईन करण्यासाठी लागणाऱ्या पाईप करिता अनुदान दिले जाते.
यासाठी पाईपलाईन अनुदान योजना राबवली जात आहे. दरम्यान आज आपण या योजनेत अंतर्गत किती अनुदान मिळते आणि यासाठी कुठे अर्ज करावा लागतो याबाबत थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती अनुदान मिळते ?
शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप साठी 35 रुपये प्रति मीटर या प्रमाणे पाचशे मीटर पर्यंत अनुदान मिळते. या अंतर्गत कमाल 15000 रुपयाचे अनुदान दिले जाते. तसेच एचडीपी पाईप साठी पन्नास रुपये प्रति मीटर याप्रमाणे 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते. या अंतर्गतही कमाल 15,000 रुपयांचे अनुदान मिळते.
पाईपलाईन अनुदान योजनेला अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा👇👇
कुठं अर्ज करावा लागतो ?
पाईपलाईन अनुदान योजनेअंतर्गत कमाल 15,000 रुपयांचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वर दिलेल्या निळ्या बटन वर क्लिक करून अर्ज करावा लागतो. अर्ज करतांना पाण्याच्या स्रोताची माहिती द्यावी लागते.
आवश्यक कागदपत्रे
यात अर्ज केलेल्या शेतकऱ्याचे नाव आल्यास त्याला काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. जमिनीचा सातबारा, 8अ, बँकेचे पासबुक व ज्या ठिकाणी आपण पाईप खरेदी करणार आहोत, त्या डीलरशिपचे कोटेशन इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतात.
विशेष म्हणजे महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना शुल्क म्हणून फक्त 23.60 रुपये भरावे लागतात. अर्थातच 24 रुपयात अर्ज केल्यानंतर पंधरा हजार रुपयांचे अनुदान पाईप खरेदीसाठी दिले जाते.