ग्रो अॅप अकाऊंट कसे उघडावे? | How to open Groww Account in Marathi (Step by Step)
आता आपण ग्रो अॅप चे नवीन अकाऊंट/खाते कसे उघडायचे हे पाहूया.
- Step 1: Mobile मधे खालील बटन वर क्लिक करून ग्रुप डाऊनलोड करावे /उघडावे👇👇
- Step 2: Groww ॲप उघडावे. तुमच्या मोबाईलमधे लॉग-इन केलेल्या ई-मेल आयडी निवडा. त्यात तुम मोबाईल नंबर भरावा आणि ‘Next’ बटण क्लिक करावे. तुमच्या मोबाइल वरती OTP येईल तो आपोआप भरला जाईल आणि मोबाइल नंबर व्हेरिफिकेशन होईल.
- Step 3 : या नंतर समोर Verify Pan असा पर्याय दिसेल. दिलेल्या जागेत आपला पॅन कार्ड क्रमांक समाविष्ट करा व Create Account बटण क्लिक करा. तिथे तुमचे पॅन कार्ड वरील नाव तपासावे लागते व Confirm करावे.
- Step 4 : तुमच्या समोर जन्मतारीख
(Date of Birth), लिंग (Gender), वैवाहिक स्थिती (Marietal Status), व्यवसाय (Occupation), उत्पन्न, ट्रेडिंग करण्याचा अनुभव अशी प्रकारे विचारलेली माहिती भरावी. KYC पूर्ण करण्यासाठी आई व वडिलांचे नाव भरावे व Next वर क्लिक करावे. यापुढे तुम्हाला म्युच्युअल फंड साठी वारस (Nominee) नेमण्याचा पर्याय दिसतो तो तुम्ही भरू शकता.
- Step 5 : आता तुम्हाला बँक खाते
निवडावे लागेल. Groww वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते जोडावे लागते. तुमचे बँक खाते असलेली बँक दिलेल्या यादीतून निवडा.
- Step 6 : त्यानंतर तुमच्या बँक शाखेचा IFSC कोड भरावा. समोर बँक शाखेची महिती दिसेल. खालील बॉक्स मधे तुमचा बँक खाते क्रमांक समाविष्ट करा व Verify Bank वरती क्लिक करा. Groww अॅप तर्फे व्हेरिफिकशन करण्यासाठी तुमच्या खात्यात ₹1 पाठवला जाईल.
- Step 7 : या नंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो काढून सबमिट करावा लागेल. पुढे तुम्हाला सही व्हेरिफिकशन करण्यासाठी तुमची सही मोबाइल वरतीच सबमिट करावी लागेल.
• Step 8: Aadhar E-Sign
करण्याकरिता ‘Proceed to E- Sign’ वर क्लिक करावे. नंतर समोर Account Opening Form दिसेल. तो आपणास वाचायचा आहे कारण त्यामध्ये ग्रो मार्फत आकारले जाणारे चार्जेस आणि इतर महत्वाची माहिती दिलेली असते. वाचल्यानंतर ‘Sign now’ वरती क्लिक करा.
- Step 9
: आपणासमोरNSDLAadhar E- Sign पोर्टल उघडेल. इथे आपणास आधार क्रमांकाच्या आधारे ई-साईन करावयाचे आहे. व्हेरिफिकेशन करण्याकरिता आधार क्रमांक भरून Send OTP वर क्लिक करावे. तुमच्या आधारकार्डशी जोडलेल्या मोबाइल नंबर वरती OTP येईल तो भरावा.
- Step 10 : या नंतर तुमचे ग्रो खाते
तयार होईल. पुढे तुम्हाला खाते सुरक्षेसाठी पिन किंवा बायोमेट्रिकने खाते सुरक्षित करावे.
आता तुम्ही Groww च्या सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता.