स्वाधार योजना पात्रता व अर्ज प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता

1- ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

2- दहावी आणि बारावीनंतर प्रवेश घेतलेला जो काही अभ्यासक्रम असेल तो दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा.

3- तसेच या विद्यार्थ्यांना 60% गुण असणे गरजेचे आहे व दिव्यांग विद्यार्थ्या असेल तर त्यांना 40 टक्के गुण असावेत.

4- तसेच सदर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे व त्याचे स्वतःचे बँकेत खाते असावे

स्वाधार योजनेंतर्गत मिळणारी मदत

  • बोर्डिंग सुविधा – 28,000 रुपये
  • निवास सुविधा – 15,000 रुपये
  • विविध खर्च – 8,000 रुपये
  • वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी 5,000 रुपये (अतिरिक्त)
  • इतर शाखा – 2,000 रुपये (अतिरिक्त)
  • एकूण – ५१,००० रुपये

असा करा अर्ज…..

  • सर्वप्रथम , वर दिलेल्या बटनवर क्लिक करा
  • तुमच्या स्क्रीनवर होम पेज उघडेल. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना फॉर्म PDF ची लिंक होम पेजवर देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक करा.
  • तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करताच तुमच्या स्क्रीनवर PDF फॉर्म उघडेल.
  • हा फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
  • प्रिंट आऊट घेतल्यानंतर अर्जात सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत तुमच्या अभ्यासक्रमांनुसार सर्व कागदपत्रे जोडा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागाकडे सबमिट करा
  •  कर्मचाऱ्यांनी तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणीकेल्यानंतर सरकारकडून तुमच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पाठवली जाईल.
  • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत तुम्ही अगदी सहजपणे आर्थिक मदत मिळवू शकता.

Leave a Comment