गाय गोठा अनुदान योजना आवश्यक पात्रता
1)महाराष्ट्र राज्यातील शेतकरी गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत
2) अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
गाय गोठा अनुदान योजना अटी
• फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
• महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
• या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे
• प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
• उपलब्ध पशुंचे जीपीएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक
• या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येईल.
• या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
• शेतकऱ्याने जर या आधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरु करण्यातआलेल्या एख्याद्या योजनेअंतर्गत गाय, म्हैस व शेळी साठी शेड बांधून घेतली असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
• एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
• आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
• अर्जदाराचे आधार कार्ड
• रेशन कार्ड
• अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
• अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
• अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
• अर्जदाराचे मतदान कार्ड
• मोबाईल क्रमांक
• अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक)
• अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा.
• आदिवासी प्रमाणपत्र
• जन्माचे प्रमाणपत्र
• जातीचे प्रमाणपत्र
• या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
• ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र / ना हरकत प्रमाणपत्र.
• ग्रामपंचायत शिफारस पत्र
• अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
• अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक, सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक.
• अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक.
• अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.
गाय गोठा सबसिडी योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराकडे पक्क्या स्वरूपाचा गोठा उपलब्ध असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
एकाचवेळी 2 अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराजवळ गाय उपलब्ध नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी अनुदान मिळवले असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
• या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची खूण करावी.
• त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
• अर्जदाराने स्वतःचे नाव, स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे.
• अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
• अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकारनिवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.
• लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत नमुना ९ जोडायचा आहे.
• लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
• तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे.
• त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
• त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यानुसार पोच पावती दिली जाईल
अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा व अर्ज सादर केल्यावर अर्जाची पोचपावती घ्यावी.
अशा प्रकारे तुमची गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल