शेतकऱ्यांनो आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकाला नुकसान करणारा कीटक म्हणजेच ,हुमणी त्याबद्दल आज आपण नियंत्रण व उपायोजना जाणून घेणार आहोत. जसे की हुमनी ही जमिनीमध्ये राहून पिकाची मुळी खाऊन आर्थिक नुकसान करणारी कीड म्हणजे हुमणी. या किडीमुळे प्रामुख्यने ऊस, भुईमूग, ज्वारी, बाजरी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ह्या किडीचे लवकर नियंत्रण न झाल्यास ३० -७० % नुकसान होऊ शकते. म्हणूनच आपल्याला ह्या किडीचा जीवनक्रम समजून एकात्मिक नियंत्रण करणे गरजेचे आहे.
हुमणी कीटकाचा जीवनक्रम
- अंडी घालण्याचा कालावधी जून-जुलै महिन्यात पूर्ण होतो.
- जमिनीत साधारणपणे 8 ते 10 सें.मी. खोलपर्यंत साबुदाण्याच्या आकाराची व लांबट गोल अंडी घालतात.
- एक मादी तिच्या जीवनकाळात 60 ते 70 अंडी देते.
- अंड्यातून 9 ते 10 दिवसांत अळी बाहेर येते.
- अळी अवस्था- 5 ते 7 महिन्यांची असते.
- जमिनीत 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते.िनीत 10 ते 15 सें.मी. खोल अर्धगोलाकार पडून राहते.
- ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अळी जमिनीत खोलवर कोषावस्थेत जाते.
- कोषावस्था 20 ते 25 दिवस असून कोष तांबूस तपकिरी रंगाचा व टणक असतो.
- कोषातून निघणारे प्रौढ कीटक पहिल्या पावसापर्यंत जमिनीतच सुप्तावस्थेत राहतात.
- अशा प्रकारे हुमणीची एका वर्षात एक पिढी पूर्ण होते.
कशा स्वरूपाचे नुकसान होते.
हुमणीचा शेतकऱ्यांना होणारा उपद्रव हा दोन भागांमध्ये दिसून येतो एक म्हणजे अळीअवस्था जी जमिनीमध्ये आढळते तसेच दुसरी भुंगा अवस्था जी झाडावर आढळते. जेव्हा हुमणी अंड्यातून बाहेर आलेल्या अळीची पहिल्या अवस्था जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वर तसेच मुळांवर देखील उपजीविका करते व दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत आळा जून ऑक्टोबर महिन्यात आढळतात व प्रामुख्याने उसाच्या मुळा खातात उसाचे मुळे खाल्ल्यामुळे अन्नद्रव्य व पाणी कमी पडते ऊस हळूहळू नुसतेच दिसायला लागतो कालांतराने वाळक्या काठी सारखा दिसतो एका वाळलेल्या उसाच्या बेटाकाली साधारणतः दहा ते बारा पर्यंत आला सापडतात एका उसाचे भेट एक अळी तीन महिन्यात तर दोन जास्त आल्या एका महिन्यात मुळात कृतडून कोरड्या करतात जमिनी खालील गाड्यांना ही अळी उपद्रव करते व ऊसाला हलकासा झटका दिल्यास उत्सर्जनसजी उपटून येतो. तू असाच अळीचा त्रास जर आपल्याला वाढत गेला तर आपले 100% पर्यंत नुकसान देखील होऊ शकते व एकरी 50 ते 20 टणापर्यंत आपले नुकसान होते. हुमणीची अळी अवस्था पिकांच्या मुळावर जगत असल्यामुळे तसेच हा कालावधीत जास्त दिवसांचा असल्यामुळे नुकसानीचे प्रमाण हे जास्त असते.
उस पिकातील हुमणी नियंत्रण
उन्हाळ्यात खोल नांगरट केल्याने जमिनीतील किडीच्या सुप्तावस्था नाश पावते.झाडांवर सुपर डी ( क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ) 30 मिली फवारणी- ( प्रति 15 लिटर ).पीक लागवडीपूर्वी- कार्बोफुरोन दाणेदार – 7 किलो प्रति एकरी प्रमाणे खतासोबत मिसळून द्यावे. परोपजीवी बुरशी डॉ. बैक्टोज़ ब्रेव – ब्यूवेरिया बेसियाना Beauveria bassiana किंवा डॉ. बैक्टोज़ मेटा मेटारायझियम ऍनिसोपली metarhizium anisopliae १ ते २ लिटर प्रति एकरी ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने द्यावे.उभ्या पिकातउपद्रव आढळल्यास ड्रीप मधून किंवा पाटपाण्याने सुपर डी ( क्लोरपायरीफॉस + सायपरमेथ्रीन ) Chlorpyriphos 50% + Cypermethrin 5% EC १ लिटर किंवा लेसेंटा ( फिप्रोनील + इमिडाक्लोप्रिड ) Fipronil 40%+ Imidacloprid 40% WG १७५ ग्राम प्रति एकरी द्यावे.