कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी, सरकारकडून मिळवा तीन कोटी रुपयांचे अनुदान!

केंद्र व राज्य सरकारकडून तळागाळातील तरुण जे शेती व्यवसाय करत आहेत, त्यांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणावर अनेक योजना राबवल्या जात आहेत. अशा योजनांचा लाभ घेऊन या तरुणांना नवीन उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चालना मिळताना दिसून येत आहे.

अशी काही उद्योग आहेत की ते सध्या अस्तित्वात आहेत, असे उद्योग ज्यांचा  विस्तार आणि विकास करण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो.

या योजनांच्या माध्यमातून जर कृषी क्षेत्राचा विचार केला तर, यामध्ये प्रक्रिया उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणावर महत्त्व आहे. प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी केंद्र सरकारच्या योजनेपैकी एक अशी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना ही या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. कृषी प्रक्रिया उद्योग बार्नीकरता एकूण प्रकल्पाच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त ३ कोटी रुपयांचे अनुदान मिळते.

कृषी प्रक्रिया उद्योगांना पाठबळ देण्यासाठी महत्त्वाची योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना.

कृषी प्रक्रिया उद्योजक उभा करण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही योजना कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून एकूण प्रकल्पाच्या ३५% व जास्तीत जास्त ३ कोटी रुपयांच्या अनुदान दिले जाते. शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना या योजनेमध्ये प्राधान्य मिळते आणि या योजनेचा फायदा मिळतो.

अशा प्रकारच्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचा विस्तार तसेच त्यांच्या स्तर वाढीसाठी या योजनेच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे.

उद्योगाच्या भांडवली गुंतवणूक तसेच पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी, इंक्युबॅशन सेंटर तसेच स्वयं सहाय्यता बचत गटांच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटिंग व ब्रँडिंग इत्यादी करता या योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो.

अर्थसहाय्य

योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख रुपये तर त्यांच्यासोबतच सामाजिक पायाभूत सुविधा, इनक्यूबॅशन केंद्र तसेच मूल्य साखळी घटकांसाठी असलेल्या प्रकल्पांच्या एकूण किमतींच्या ३५% किंवा जास्तीत जास्त ३ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळते.

शेतकरी, बेरोजगार युवक तसेच उद्योजक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट व शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी करता किंवा त्यांच्या विस्तारीकरणाकरता व आधुनिकरणाकरता या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेणे ही देशाच्या किंबहुना राज्याच्या प्रगतीसाठी खूप गरजेचे आहे.

व्याजदरात सवलत

आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेले शेतकरी उत्पादक कंपनी तसेच गट व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प उभारणी वेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेबाबत कृषी पायाभूत योजनेचा ताळमेळ घातला  तर मिळणाऱ्या अनुदानासोबत त्यांना ३ टक्के व्याज दरात  सवलत मिळते.

अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी

या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला जर अर्ज करायचा असेल तर, त्यांनी कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधने आवश्यक आहे.

या संबंधित अधिक माहिती करता खालील वेबसाईटवर संपूर्ण माहिती मिळेल.👇👇👇

https://pmfme.mofpi.gov.in

या योजनेबाबत बोलायचे झाले तर ग्रामीण भागातील युवा शेतकऱ्यांना ही एक सुवर्णसंधी आहे स्वतःचा स्टार्टअप सुरू  करून, आपल्या देशाच्या किंबहुना राज्याच्या प्रगती मधील एक भागीदार होण्याची खूपच मोठी सुवर्णसंधी आहे.

Leave a Comment