पर्यायी खतांचा वापर करून,असा कमी करा शेतीमधील अवाजवी खर्च!

सध्या राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे, किंवा मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा सुखावला आहे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये पेरणीची घाई सुरू झाली आहे. राज्यामध्ये सध्या सोयाबीन या पिकाला एक महत्त्वाचे व्यापारी पीक म्हणून शेतकरी वर्गामध्ये खूपच आकर्षण आहे. कारण हे पीक शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देऊन जाते.

पेरणी करायचे म्हटले तर बी बियाणे खते हे शेतकऱ्यांमध्ये सर्वसामान्य झाले आहे, कारण पेरणीसाठी बियाणांबरोबर खतेही वापरणे खूपच आवश्यक आहे. कारण खतामुळेच पीके जोमदारपणे येते. पण काही वेळा बाजारामध्ये या खतांचा तुटवडा भासतो. अशावेळी शेतकरी यांना खूपच धावपळ करावी लागते. एवढे करूनही शेवटी त्यांच्या पदरी निराशाच येते, म्हणजे त्यांना ही खते उपलब्ध होत नाहीत. विशेषता शेतकरी हे डीएपी या खतावर खूपच अवलंबून आहेत. पण या खताची उपलब्धता नसेल तर शेतकऱ्यांना डीएपी ला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोयाबीन लागवड क्षेत्र हे खूपच जास्त आहे. सोयाबीन लागवड करताना शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मागणी मध्ये सातत्याने वाढ होत आहे परंतु मागणीनुसार बाजारामध्ये  डीएपी खताची उपलब्धता बाजारामध्ये सध्या नाही. या खताची उपलब्धता करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात आहेत.

डीएपी ला पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी वापरावी ही खते

सोयाबीन लागवडीसाठी डीएपी या खताची उपलब्धता नसल्यामुळे शेतकरी बंधूंनी डीएपी खताला पर्याय म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट १४३.५ व युरिया १९ किलो या पर्यायी खतांचा वापर करावा. या खतांचा वापर केल्यामुळे डीएपी खताप्रमाणेच अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होईल व त्यासोबत गंधक १६ किलो ही उपलब्ध होते. गंधक ही अन्नद्रव्य सोयाबीन पिकासाठी अत्यंत गरजेचे आहे. गंधकामुळे सोयाबीन पिकाच्या दाण्याचा आकार वाढेल व उत्पादनामध्ये भरघोस वाढ होईल. शेतकऱ्यांनीही एकाच खताचा हट्ट धरून बसण्यापेक्षा पर्यायी खतांचाही गंभीरतेने वापर करावा असे आवाहनही कृषी विभागाकडून केले आहे.

पर्यायी खतांच्या वापरामुळे होणार शेतकऱ्यांच्या खर्चात बचत

कृषी विभागाने पर्यायी खत वापरल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते हे वारंवार सांगितले आहे. शेतकऱ्यांनी डीएपी व गंधक यांचा एकत्रित वापर केल्यास १९९० रुपये इतका खर्च येतो. पण युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर केल्यास १६६१ रुपयांचामध्ये १६ किलो गंधकासह डीएपीतील सर्व घटक उपलब्ध होतात. हा फायदा पर्यायी खतांचा वापर केल्याने होतो.

शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होणाऱ्या या पर्यायी खतांचा वापर करण्याचे कृषी विभागाने सुचवले आहे‌‌.‌‌ परंतु पर्यायी खते वापरताना कृषी विभागाच्या सूचनेनुसारच ही खते वापरणे अनिवार्य आहे,अन्य कोणाच्या सूचनेनुसार पर्यायी खते वापरू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खत विक्रेत्यांकडून घेतला जातो शेतकऱ्यांच्या  असाहाय्यतेचा फायदा

खतांची उपलब्धता नसल्यास कोणती पर्यायी खते वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे असे वारंवार सांगूनही शेतकरी खत विक्रेत्यांची मदत घेतो. मात्र शेतकऱ्यांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन खत विक्रेते अनावश्यक खते व रासायनिक द्रव्ये शेतकऱ्यांना घेण्यासाठी सक्ती करतात. यापासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.

खत विक्रेत्याकडून अनेक वेळा चुकीच्या पद्धतीची खते किंवा रासायनिक द्रव्ये वापरण्याची सक्ती केली जाते. शासनाने जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व खत विक्रेतांना असे आवाहन केले आहे की त्यांनी लिंकिंग विरहित रासायनिक खताचा पुरवठा करणे अनिवार्य आहे. मात्र काही वेळा आवश्यक खतांची उपलब्धता नसल्यामुळे कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे पर्यायी खताचा वापर करावा.

Leave a Comment