नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करून ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदी विराजमान होतात मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या बैठकीमध्ये त्यांनी ग्रामीण आणि शहरी असे मिळून ३ कोटी नवीन घरकुलांना मंजुरी दिली आहे. मागील दहा वर्षांमध्ये सरकारने ४.२१ कोटी घरकुले बांधली होती.
प्रधानमंत्री आवास योजनेचा मागील दहा वर्षाचा आढावा
केंद्र सरकार द्वारे २०१५-१६ पासून ग्रामीण तसेच शहरी भागातील असे नागरिक की जे केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांमध्ये त्यांचा समावेश होतो. अशा नागरिकांना काही मूलभूत सुविधा सह घरी बांधून देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना राबवली आहे. केंद्र सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत मागील १० वर्षांमध्ये गरीब आणि गरजवंत नागरिकांनी ४.२१ कोटी घरकुलांचा लाभ घेतल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांना घराबरोबरच शौचालय, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन यासारख्या मूलभूत सुविधाही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिल्या आहेत.
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
१. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ हा ज्या कुटुंबाकडे स्वतःचे घर नाही त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येतो.
२. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर घर नसावे.
३. केंद्र तसेच राज्य सरकार द्वारे चालवण्यात येत असलेल्या अशा कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
४. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ६ लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
५. बीपीएल शिधापत्रिका (दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड) असणे आवश्यक आहे.
वरील अटींमध्ये जर एखादा व्यक्ती किंवा एखादे कुटुंब बसत असेल तर त्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येतो.