सोन्याचेही लक्षण काही बरे नाही. रिअल इस्टेट क्षेत्रात संभ्रमावस्था आहे. शेअर बाजाराबाबत निश्चित काही सांगणे कठीण आहे. कारण घसरत्या रुपयाने विदेशी गुंतवणूकदार संस्था (एफआयआय) चिंतित आहेत. अशा स्थितीत आता प्रश्न असा आहे की, गुंतवणूक कोठे करावी? सध्या शेअर बाजार आणि करमुक्त रोख्यांत गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आहेत. मात्र, रुपयाचे अवमूल्यन पाहता काळजी घ्यायला हवी. मध्यम कालावधीच्या उद्दिष्टांसह शेअर बाजारातील गुंतवणूक करणे एक चांगली खेळी ठरेल. व्याजदर घसरत असल्याने शेअर बाजार आणि करमुक्त रोखे यांत तेजी येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीमुळे येणारी तेजी-मंदी
प्रत्येक निवडणुकीच्या काळात तेजी-मंदी पाहावयास मिळते. जानेवारी 23 पासून एक वर्षाच्या तुलनेत सध्या शेअर बाजारात मोठी तेजी पाहावयास मिळत आहे. सेन्सेक्स ने मागील वर्षी फेबु 2023 मध्ये 60 च्या घरात होता, तो 57 हजारांपर्यंत खाली येऊन 73300 उच्चांकी पातळीवर जाऊन 72 हजारांवर पोहचला आहे. मागच्या वर्षभरात 17% परतावा दिला आहे.
मागील फेब्रुवारी 2023 मध्ये निफ्टी 18 हजारांच्या घरात होता. तो 16800 पर्यंत खाली येऊन 22097 उच्चांकी पातळीवर जाऊन आज 21910 वर पोहचला आहे. वर्षभरात 21% परतावा दिला आहे. निफ्टी मिडकॅप मागील वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये 30886 च्या घरात होता, तो 29 हजारांपर्यंत खाली येऊन 49780 उच्चांकी पातळीवर जाऊन 48800 वर पोहचला आहे. वर्षभरात 59% परतावा दिला आहे. निफ्टी स्मॉलकॅप मागील वर्षी फेबु्रवारी 2023 मध्ये 9400 च्या घरात होता, तो 8682 पर्यंत खाली येऊन 16691 उच्चांकी पातळीवर जाऊन आज 16105 वर पोहचला आहे. वर्षभरात 71% परतावा दिला आहे. तेजी आणि मंदी मार्केटचा स्वभाव असतो. सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या की, बाजारामध्ये अस्थिरता प्रचंड प्रमाणात आढळते. बाजाराची दिशा समजून येत नाही. सध्या अल्पकाळासाठी भांडवली बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे ठरू शकते. दीर्घकालीन द़ृष्टिकोन ठेवून गुंतवणूक करणे हे फायद्याचे ठरू शकते यात वाद नाही. तथापि, गुंतवणूकदारांना सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी गुंतवणूक करून बाजारातील रॅलीचा फायदा होत आहे. बाजाराची वेळ आव्हानात्मक असली तरी, निवडणुका बाजाराच्या संभाव्य हालचालींसाठी स्पष्ट टाईमलाईन देतात. दीर्घ मुदतीत, निवडणुकांशी संबंधित अल्पकालीन अस्थिरता असूनही शेअर बाजारांने मागील वर्षभरात चांगला सकारात्मक परतावा दिला आहे. मागील काही निवडणूक काळातील अंदाज घेतला, 2009 चा काळ सोडला तर निवडणूकपूर्व काळात भारतीय शेअर बाजारांनी चांगला सकारात्मक कल दिला आहे. निवडणुकीच्या काळात मार्केट कोणते सरकार येईल याचा अंदाज घेऊन तेजी-मंदी दर्शवित असते. स्टॉक मार्केटमध्ये सामान्यत: निवडणुकांनंतर स्थिरता दिसून येते, जे गुंतवणूकदारांना खात्रीचे वातावरण देऊ शकते. निवडणुकांनंतर, सरकारच्या धोरणात स्पष्टता येत असते.
निवडणुकीपूर्वी तेजी-मंदी साधून गुंतवणूकदार स्वतःला फायदा मिळवून घेऊ शकतात. निवडणूक काळात धोरणात्मक सुधारणा आणि उपक्रम आणतात. ज्यामुळे विशिष्ट क्षेत्रे आणि उद्योगांवर परिणाम होऊ शकतो. निवडणुकीपूर्वी गुंतवणूक करून, विविध राजकीय पक्षांच्या प्रस्तावित धोरणांमुळे निर्माण होणार्या संभाव्य क्षेत्र-विशिष्ट संधींचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदार स्वत:ला स्थान देऊ शकतात. केवळ राजकीय धोरणांचा बाजारांवर थेट परिणाम होत नाही, तर परकीय गुंतवणूक जागतिक बाजाराची अवस्था चलन बाजारातील घडामोडी भारतीय रुपयाच्या मूल्याचाही परिणाम होत असतो. काय निष्कर्ष काढावे? हा प्रश्न समोर येत असेल, तर सध्याच्या तेजीमध्ये गुंतवणूक केली तर फायदा होऊ शकतो. येणार्या काळात मंदी आली तर नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करताना एकदम सर्व रक्कम गुंतवणूक करण्यापेक्षा थोडी थोडी सातत्याने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा निर्णय योग्य ठरणार आहे. भांडवली बाजार हा दीर्घकाळासाठी आहे. यामध्ये जोखीम असते. ते समजावून घेतले पाहिजे. मगच गुंतवणूक केली पाहिजे. (Share Market) मागील पाच निवडणुकांच्या काळात निवडणूकपूर्व काळ निवडणुकीनंतर बाजाराने खालीलप्रमाणे तेजी-मंदी दाखविली आहे.