आपला देश कृषीप्रधान देश म्हणून जगभरात ओळखला जातो. कारण देशात जवळपास 50% च्या वर लोक हे आपला प्रमुख व्यवसाय म्हणून शेती व्यवसाय करतात. शेती व्यवसाय इथूनच त्यांच्या मूलभूत गरजा भागवल्या जातात. पण मूलभूत गरजा भागवण्याबरोबरच शेतकरी आपल्या शेतीमध्ये व्यापारी पिके घेऊन त्यातून चार पैसे मिळवणे. या दृष्टीनेही शेती व्यवसाय केला जात आहे.
पण सध्याला शेती व्यवसाय करताना खूप सारे अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक समस्या चा समावेश होतो, यामध्ये प्रामुख्याने दुष्काळ, पूर यांचा समावेश केला जातो. त्यानंतर शेतकरी मालाला योग्य ते भाव मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. रासायनिक खतांचे दर गगनाला भेटल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारी धोरणे ही काही प्रमाणात या बाबतीत कारणीभूत आहेत.
पण, २०२४-२५ हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती बातमी म्हणजे या हंगामासाठी कोणत्या पिकांना किती पीक कर्ज मिळेल याबाबत राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शिफारस केल्याप्रमाणे,नाबार्डच्या सूचनेनुसार पीक कर्जाच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. कोणत्या पिकाला किती पीक कर्ज मिळेल याबाबत आपण सविस्तर पाहूया…
रब्बी हंगामातील पीक कर्ज
१. गहू : प्रति हेक्टर ₹५६,०००
२. सूर्यफूल : प्रति हेक्टर ₹ ३६,४५६
३. रब्बी ज्वारी : प्रति हेक्टर ₹ ५०,०००
खरीप हंगामातील पीक कर्ज
१. कापूस : प्रति हेक्टर ₹ ८३,८८३
२. सोयाबीन : प्रति हेक्टर ₹ ६६,१६३
३. तुर : प्रति हेक्टर ₹ ५८,०३५
४. खरीप ज्वारी : प्रति हेक्टर ₹ ५२,७४५
५. बाजरी : प्रति हेक्टर ₹ ५१,२१०
६. उडीद : प्रति हेक्टर ₹ ३०,०००
७. मूग : प्रति हेक्टर ₹ २८,०००
फळबागांसाठी पीक कर्ज
१. आंबा : प्रति हेक्टर ₹ २,२५,०००
२. केळी : प्रति हेक्टर ₹ १,५१,०००
भाजीपाला पीक कर्ज
१. मिरची : प्रति हेक्टर ₹ १,११,५३३
२. टोमॅटो : प्रति हेक्टर ₹ १,२०,०००
३. बटाटा (आलू) : प्रति हेक्टर ₹ ९७,०००
४. कांदा : प्रति हेक्टर ₹ १,१४,०००
शेतकरी वर्गासाठी महत्त्वाची माहिती
१. जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही पीक कर्ज उद्दिष्ट बाबत कोणतीही बैठक घेतली गेली नाही.
२. मागील काही वर्षापासून बँकांकडून पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टामध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून आली आहे.
३. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक कर्जाची बचत खाती ही थकीत आहेत.
पीक कर्जाच्या बाबतीत सरकारच्या पुढील सूचनेनुसार किंवा सरकारच्या नवीन जीआर नुसार शेतकऱ्यांनी बँकांशी संपर्क साधून पीक कर्जासाठी २०२४-२५ च्या हंगामासाठी अर्ज करावेत.