तुम्हाला माहिती आहे का, की भारतीय नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड पुनर्मुद्रण (PAN card reprint process India) करण्याची सुविधा दिली जाते. हे काम ऑनलाइन पद्धतीने करता येते. तथापि, आपणास हे समजून घेणे आवश्यक आहे की पॅन कार्ड पुनर्मुद्रित करणे म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये कोणतेही नवीन बदल करायचे नाहीत. हे नवीन पॅनकार्ड असेल आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त तुमची जुनीच माहिती असेल. याविषयीची सविस्तर माहिती सदरच्या लेखांमध्ये सविस्तरपणे पाहू.
तुमचे पॅनकार्ड जुने झाले आहे, आणि त्यावरील मजकूर हा अंधुक दिसत आहे का? जर होय, तर ही माहिती तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकते.
तुम्हाला माहिती आहे का,की भारतीय नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड पुनर्मुद्रण (PAN card reprint process India) करण्याची सुविधा दिली जाते. हे काम ऑनलाइन पद्धतीने करता येते.
तथापि, येथे हे समजून घेणे खूपच आवश्यक आहे की, पॅन कार्ड पुनर्मुद्रित करणे म्हणजे तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये कोणतेही बदल करायचे नाहीत. हे नवीन पॅनकार्ड असेल ज्यामध्ये फक्त तुमची जुनी माहिती असेल.
पॅन कार्ड ऑनलाईन पद्धतीने कसे रिप्रिंट करावे?
१. पॅन कार्ड पुनर्मुद्रित करण्यासाठी, तुम्ही UTIITSL (UTI infrastructure technology and services limited) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता, जी भारत सरकारने नियुक्त केली आहे. त्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा. https://www.pan.utiitsl.com/.
२. येथे तुम्हाला खाली स्क्रोल करून रीप्रिंट पॅन कार्डच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
३. आता तुम्हाला पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करावे लागेल.
४. आता नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला पॅन नंबर आणि जन्म तारखेची माहिती द्यावी लागेल.
५. तुम्हाला कॅप्चा टाकावा लागेल आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल.
६. तपशील सबमिट केल्यानंतर, तुम्हाला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि पॅन कार्ड पुनर्मुद्रणासाठी पैसे भरावे लागतील.
७. पेमेंट केल्यानंतर, स्क्रीनवर दिलेल्या माहितीसह पॅन कार्डचे पुनर्मुद्रण केल्याची स्थिती जाणून घेतली जाऊ शकते.
पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते?
पॅन कार्डचे पुनर्मुद्रण करून घेण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. मात्र, भारतात राहणारे नागरिक आणि भारताबाहेर राहणारी नागरिक यांच्यासाठी हे शुल्क स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आले आहे.
UTIITSL (UTI infrastructure technology and services limited) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, जर पॅन कार्ड भारतीय पत्त्यावर वितरित केले गेले तर त्यासाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.
त्याचवेळी, भारताबाहेर पॅन कार्ड वितरित करण्यासाठी, 959 रुपये शुल्क भरावे लागेल.
वरील माहितीच्या आधारे आपण आपल्या पॅन कार्ड वरील प्रिंट अंधुक स्थितीत असेल तर आपण वरील प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड प्रिंट करून घेऊ शकता.