टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर… या तारखेपासून सुरू होणार क्रिकेटचा रणसंग्राम!

नुकताच आयपीएल 2024 चा रोमांचक थरार पार पडला. आयपीएल 2024 चे जेथे पद कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाने पटकावले. आयपीएलच्या थरारून बाहेर पडतो ना पडतो तोच आपणास टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार सुरू होणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

भारतीय संघाविषयी बोलायचे झाले तर भारतीय संघ हा खूप वेळा चांगले प्रदर्शन करूनही विजेतेपदाला गवसणी घालण्यात अपयशी ठरला आहे. पण सध्या भारतीय खेळाडूंचा आयपीएल मधील परफॉर्मन्स पाहिला तर t20 वर्ल्ड कप चा प्रमुख दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जाते.

यावर्षी जून 2024 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषकाचे आयोजन आयसीसी ने एक दोन मोठ्या देशावर सोपवले आहे. त्यामध्ये पहिला देश म्हणजे वेस्टइंडीज आणि दुसरा म्हणजे अमेरिका (यूएसए)

वेस्टइंडीज आणि यूएसए मधील एकूण नऊ मैदानावर हे सामने खेळवले जाणार आहेत. विश्वचषक 2024 मध्ये एकूण 55 सामने खेळवले जातील. टी ट्वेंटी विश्वचषक 2024 चा पहिला सामना यजमान यूएसए आणि कॅनडा यांच्यात होणार आहे.

याचबरोबर उपांत्य फेरीचे सामने 26 आणि 27 जून रोजी तर अंतिम सामना 29 जून रोजी Barbados (वेस्ट इंडीज )येथे होणार आहे.

पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत पाकिस्तान भिडणारी या दिवशी

भारतीय संघ हा अ गटात आहे,यामध्ये आयर्लंड पाकिस्तान अमेरिका आणि कॅनडा हे संघ आहेत. भारतीय संघाचे पहिले तीन गट सामने न्यूयॉर्क या ठिकाणी होणार आहेत. यामध्ये भारत हा 5 जून रोजी आयर्लंड या संघा बरोबर पहिला सामना खेळणार आहे. तर दुसरा सामना 9 जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होईल, 12 जून रोजी अमेरिकी विरुद्ध तिसरा गट सामना आणि भारताचा शेवटचा गट सामना 15 जून रोजी कॅनडा विरुद्ध होणार आहे.

भारतीय संघाचे सामने असे असतील

  • 5 जून – आयर्लंड, न्यूयॉर्क
  • 9 जून – पाकिस्तान, न्यूयॉर्क
  • 12 जून – अमेरिका, न्यूयॉर्क
  • 15 जून – कॅनडा, फ्लोरीडा

वरील चार सामन्यांपैकी पाकिस्तान विरुद्ध सामना भारतीय संघासाठी खूपच महत्त्वाचा आहे कारण हे दोन्ही संघ एकमेकांचे खूपच कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखले जातात.

🔴🔴🔴🔴

“`html

तारीखमैचवेन्यू
1 जून 2024यूएसए vs कनाडाडलास
2 जून 2024वेस्ट इंडीज़ vs पापुआ न्यू गिनीगुयाना
2 जून 2024नामीबिया vs ओमानबारबाडोस
3 जून 2024श्रीलंका vs दक्षिण अफ्रीकान्यूयॉर्क
3 जून 2024अफगानिस्तान vs युगांडागुयाना
4 जून 2024इंग्लैंड vs स्कॉटलैंडबारबाडोस
4 जून 2024नीदरलैंड vs नेपालडलास
5 जून 2024भारत vs आयरलैंडन्यूयॉर्क
5 जून 2024पापुआ न्यू गिनी vs युगांडागुयाना
5 जून 2024ऑस्ट्रेलिया vs ओमानबारबाडोस
6 जून 2024यूएसए vs पाकिस्तानडलास
6 जून 2024नामीबिया vs स्कॉटलैंडबारबाडोस
7 जून 2024कनाडा vs आयरलैंडन्यूयॉर्क
7 जून 2024न्यूजीलैंड vs अफगानिस्तानगुयाना
7 जून 2024श्रीलंका vs बांग्लादेशडलास
8 जून 2024नीदरलैंड vs दक्षिण अफ्रीकान्यूयॉर्क
8 जून 2024ऑस्ट्रेलिया vs इंग्लैंडबारबाडोस
8 जून 2024वेस्ट इंडीज़ vs युगांडागुयाना
9 जून 2024भारत vs पाकिस्तानन्यूयॉर्क
9 जून 2024ओमान vs स्कॉटलैंडएंटीगुआ
10 जून 2024दक्षिण अफ्रीका vs बांग्लादेशन्यूयॉर्क
11 जून 2024पाकिस्तान vs कनाडान्यूयॉर्क
11 जून 2024श्रीलंका vs नेपालफ्लोरिडा
11 जून 2024ऑस्ट्रेलिया vs नामीबियाएंटीगुआ
12 जून 2024यूएसए vs भारतन्यूयॉर्क
12 जून 2024वेस्ट इंडीज़ vs न्यूज़ीलैंडत्रिनिदाद
13 जून 2024इंग्लैंड vs ओमानएंटीगुआ
13 जून 2024बांग्लादेश vs नीदरलैंडसेंट विंसेंट
13 जून 2024अफगानिस्तान vs पापुआ न्यू गिनीत्रिनिदाद
14 जून 2024यूएसए vs आयरलैंडफ्लोरिडा
14 जून 2024दक्षिण अफ्रीका vs नेपालसेंट विंसेंट
14 जून 2024न्यूज़ीलैंड vs युगांडात्रिनिदाद
15 जून 2024भारत vs कनाडाफ्लोरिडा
15 जून 2024नामीबिया vs इंग्लैंडएंटीगुआ
15 जून 2024ऑस्ट्रेलिया vs स्कॉटलैंडसेंट लूसिया
16 जून 2024पाकिस्तान vs आयरलैंडफ्लोरिडा
16 जून 2024बांग्लादेश vs नेपालसेंट विंसेंट
16 जून 2024श्रीलंका vs नीदरलैंडसेंट लूसिया
17 जून 2024न्यूज़ीलैंड vs पापुआ न्यू गिनीत्रिनिदाद
17 जून 2024वेस्ट इंडीज vs अफगानिस्तानसेंट लूसिया
19 जून 2024ए2 vs डी1एंटीगुआ
19 जून 2024बी1 vs सी2सेंट लूसिया
20 जून 2024सी1 vs ए1बारबाडोस
20 जून 2024बी2 vs डी2एंटीगुआ
21 जून 2024बी1 vs डी1सेंट लूसिया
21 जून 2024ए2 vs सी2बारबाडोस
22 जून 2024ए1 vs डी2एंटीगुआ
22 जून 2024सी1 vs बी2सेंट विंसेंट
23 जून 2024ए2 vs बी1बारबाडोस
23 जून 2024सी2 vs डी1एंटीगुआ
24 जून 2024बी2 vs ए1सेंट लूसिया
24 जून 2024सी1 vs डी2सेंट विंसेंट
26 जून 2024सेमी फाइनल-1गुयाना
27 जून 2024सेमी फाइनल-2त्रिनिदाद
29 जून 2024फाइनलबारबाडोस

टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 चा फॉरमॅट

टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 हा एक जून ते 29 जून दरम्यान वेस्टइंडीज आणि अमेरिका (यूएसए) या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण तीन टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटांमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील.

यानंतर,सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

शेवटी दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.

या पद्धतीने विश्वचषकाचे फॉरमॅट असेल, त्याचबरोबर सर्व भारतीयांना आशा आहे की यावर्षीचा t20 वर्ल्ड कप भारतीय संघ घेईल.

Leave a Comment