मतदान कार्ड बरोबर मोबाईल नंबर  लिंक केल्यास मिळणार हे फायदे? जाणून घ्या सोपी पद्धत!

मतदार ओळखपत्र हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मतदान करण्यासाठी आणि तुमची ओळख पडताळून पाहण्यासाठी मतदार कार्डाचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदान कार्डशी लिंक करता  तेव्हा तुमच्यासाठी मतदान कार्डशी संबंधित माहिती ऑनलाइन अपडेट करणे खूप सोपे होते. समजा तुमचे मतदार ओळखपत्र हरवले आहे आणि तुम्हाला ते ऑनलाइन डाउनलोड करायचे आहे, तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर मतदान कार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. यासह मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, तुम्ही तुमचा निवडणूक फोटो ओळखपत्र क्रमांक (EPIC) लक्षात  ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

मतदान कार्डाशी मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर येऊ शकतात अडचणी

अनेक लोकांसोबत असे घडते की, त्यांचे मतदार ओळखपत्र गहाळ होते आणि त्यांना कोणता मोबाईल क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडलेला आहे हे आठवत नाही . त्याच वेळी अनेक लोकांचा मोबाईल क्रमांक त्यांच्या मतदार ओळखपत्रात जोडलेला नसतो. जर तुम्ही अजूनही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केलेला नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात. 

मतदान कार्ड मोबाईल नंबरची कसे लिंक करायचे?

तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर मतदान कार्डशी कसा लिंक करायचा हे जाणून घ्यायचे असेल तर,आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगणार आहोत. जेणे करून तुम्ही हे काम मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून घरी बसून करू शकता. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मतदान कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची प्रक्रिया किंवा दुरूस्ती पूर्णपणे मोफत आहे. चला तर मग जाणून घेऊया…

मतदान कार्डाची मोबाईल नंबर लिंक करायची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप

१.सर्वप्रथम अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल https://www.nvsp.in वर जा.

२.आता मोबाईल नंबर, ईमेल, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरून राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या वेबसाइटवर लॉग इन करा.

३.तुम्ही नवीन वापरकर्ता असाल तर साइन अप करा. यासाठी मोबाईल नंबर, ईमेल आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर पुढे जा.

४.तुमच्या दिलेल्या मोबाईल नंबरवर ‘वन टाइम पासवर्ड’ प्राप्त करण्यासाठी ‘ओटीपीची विनंती करा’ वर क्लिक करा.

५.मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी टाका त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.

६.येथे, मतदार कार्डमध्ये तुमचा मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी, तुम्हाला मुख्यपृष्ठावर जावे लागेल आणि फॉर्म 8 वर क्लिक करावे लागेल.

७.यानंतर, ‘Self’ निवडा आणि ‘Submit’ बटणावर क्लिक करा किंवा इतर निवडा, epic भरा आणि सबमिट करा.

८.पुढील स्क्रीनवर तुम्हाला मतदारांचे तपशील दिसतील त्यानंतर ओके वर क्लिक करा.

९.यानंतर दुसऱ्या क्रमांकावर दिलेला करेक्शन पर्याय निवडा. 

१०.आता तुमच्या समोर फॉर्म 8 उघडेल, तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर किंवा ईमेल टाका आणि पुढील वर क्लिक करा.

११.येथे तुम्ही जागा भरा आणि कॅप्चा कोड देखील टाका आणि ‘ओटीपी पाठवा’ बटणावर क्लिक करा.

१२.यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा आणि फॉर्मच्या तपशीलांचे पूर्वावलोकन केल्यानंतर, ‘सबमिट’ वर क्लिक करा.

१३.सुमारे 48 तासांनंतर, तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदार ओळखपत्राशी लिंक केला जाईल.

अशाप्रकारे तुम्ही वरील माहितीचा स्टेप बाय स्टेप वापर करून स्वतःचे मतदान कार्ड आपल्या मोबाईल नंबरशी घरच्या घरी स्वतःच्या मोबाईल वरून मोफत लिंक करू शकता.

Leave a Comment