तलाठी भरती निकाल 2023 | तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024

तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी 2024: तलाठी भरती सुधारित गुणवत्ता यादी दि. 11 मार्च 2024 रोजी जाहीर झाली आहे. या आधी भूमी अभिलेख विभागाने 05 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती निअक्ल जाहीर केला होता. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. या लेखात तलाठी भरती 2024 निकाल डाउनलोड करायची लिंक याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तलाठी पदभरती 2023 साठी TCS-ION कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षेतील प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत, TCS-ION कडुन घेतलेल्या निर्णयाच्या कार्यवाही विरुद्ध मा. उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र. 1744/2024 दाखल करण्यात आली होती. मा. उच्च न्यायालयाने दि. 13/02/2024 रोजी याचिकाकर्त्याने सादर केलेल्या निवेदनातील तक्रारीचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिला आहे. या निर्देशानुसार कळविण्यात येते की,

तलाठी भरती निकाल 2024

तलाठी पदभरती करीता परीक्षा TCS-ION कंपनीकडून एकूण 57 सत्रांमध्ये दि. 17/08/2023 ते दि. 14/09/2023 तारखेपर्यंत राबविण्यात आली आहे. परीक्षा झाल्यानंतर दि. 28/09/2023 ते दि. 08/10/2023 या कालावधीत प्रश्न/उत्तरांबाबत TCS-ION कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुन्हा पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही TCS-ION कंपनीकडून आता पूर्ण करण्यात आली आहे.

तलाठी भरती निकाल पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

तलाठी भरती 2023

या पुर्नविलोकनानंतर TCS-ION कंपनीकडून 79 प्रश्नांमध्ये उत्तरसूची/प्रश्न यांबाबत घेतलेले आक्षेप बरोबर असल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता प्रश्न उत्तर तालीकेतील एकूण 219 प्रश्नांमध्ये / त्यांच्या उत्तरसूचीत बदल करण्यात येत आहे. एकूण 39 प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत. तसेच 180 प्रश्नांचे संपूर्ण गुण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे. तसेच प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर 219 प्रश्नांतील बदलानुसार गुणवत्ता यादीमध्ये बदल झाला आहे. त्यानुसार सोबत 36 जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुधारीत गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

तलाठी भरती निकाल यादी

तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखुन ठेवण्यात येत असुन त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येते आहे. तसेच सोबत 11 अशा उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे ज्यांचेबाबत शासनस्तरावर नंतर निर्णय घेणेत येईल.

तलाठी भरती जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी PDF फाईल डाउनलोड करा

: तलाठी भरती जिल्हा निहाय सुधारित गुणवत्ता यादी PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment