आज दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर लगेचच अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू होईल व या अकरावीची प्रवेश प्रक्रिया दोन प्रकारे केली जाते एक ऑफलाइन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने व काही शहरांमध्ये ऑनलाईन पद्धतीने असते व इतर ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने.
अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया (Online Process) सुरु झालीये . दुसरा भाग निकाल ज्यांचे बाकी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त सगळ्यांना चालू करून देण्यात आलाय. आता अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशाला देखील सुरुवात करण्यात आलीये. त्यानुसार विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन 23 जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहे. मुंबई महानगर विकास क्षेत्राबाहेरील अकरावीच्या ऑफलाइन प्रवेशाला (Offline Entrance) सुरुवात झाली आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक (Timetable For 11th Admissions) जाहीर केले असून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार 25 व 26 जुलैला निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे.
ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा
- ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे त्या कॉलेजमध्ये जावे लागेल.
- त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक ऍडमिशन फॉर्म भरून द्यावा लागेल.
- त्या फॉर्म सोबत तुमच्या आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स देखील जमा करावी लागतील.
- त्यानंतर तुम्हाला निवड यादी ची प्रतीक्षा करावी लागेल. तुमची निवड यादी तुमच्या कॉलेज वरती मिळेल.
- निवड यादीत नाव येताच तुम्ही तुमची प्रवेश प्रक्रिया फी व इतर ओरिजनल डॉक्युमेंट जमा करून ऍडमिशन कन्फर्म करू शकता.
कोण कोणत्या जिल्ह्यात ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया होते
◽ सातारा ◽ सोलापूर ◽कोल्हापूर ◽नांदेड ◽ बीड ◽यवतमाळ ◽लातूर ◽गोंदिया◽ गडचिरोली◽ हिंगोली ◽सांगली ◽रायगड ◽रत्नागिरी◽ सिंधुदुर्ग ◽वर्धा ◽चंद्रपूर ◽जळगाव ◽नंदुरबार
ऑफलाइन प्रवेशाचे वेळापत्रक
- 23 जुलैपर्यंत प्रवेश अर्जाचे वितरण व संकलन
- 25, 26 जुलै – गुणवत्तेनुसार निवड यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करणे
- 27 ते 30 जुलै- निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
- 1, 2 ऑगस्ट – जागा शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
- 3, 4 ऑगस्ट दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश
ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा
- तुम्हाला सर्वप्रथम खाली दिलेली लिंक ओपन करायचे आहे 👉https://11thadmission.org.in/
- लिंक ओपन केल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगिन आयडी व पासवर्ड सेट करणे.
- त्यामध्ये असणारा वैयक्तिक माहिती अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून सदर अर्ज प्रमाणित करून घेणे.
- त्यानंतर महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे.
- पायरी 1 : वैयक्तिक माहिती
- https://11thadmission.org.in/या अधिकृत महाराष्ट्र FYJC वेबसाइट ओपन करा
- त्यामध्ये तुमचा जिल्हा व कॉलेज निवडा.
- नोंदणी फॉर्ममध्ये प्रवेश करण्यासाठी ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करा.
- नाव, फोन नंबर, ईमेल इत्यादी वैयक्तिक माहिती भरा.
- माहिती भरल्यानंतर ‘नोंदणी करा’ वर क्लिक करा.
- अर्ज क्रमांक आणि लॉगिन आयडी अँड करा.
- पुढे दिलेला कॅपच्या व्यवस्थित वापरून लॉग इन करण्यासाठी पुढे जा.
- अर्जाचे पुन्हा एकदा निरीक्षण करा आणि आवश्यक बदल करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (कमाल आकार 1MB).
- उपलब्ध पेमेंट पद्धतींद्वारे तुमची प्रवेश फी जमा करू शकता.
- अर्जाचे पुन्हा एकदा निरीक्षण केल्यानंतर अर्ज लॉक करा.
- यानंतर तुम्हाला तुमचे पेमेंट व्यवस्थित रित्या पूर्ण झालेले व तुमचा अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट झालेले एक पोचपावती मिळेल ती प्रिंट करून घ्या.
कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होते
◽मुंबई ◽पुणे ◽अमरावती ◽नाशिक ◽ ठाणे ◽ रायगड
10 ऑगस्टपर्यंत मुदत
ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची एकत्रित माहिती गुणवत्ता यादीसह 10 ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी प्राचार्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर आलेल्या सर्व अर्जांची एकत्रित गुणवत्ता यादी, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीनुसार झालेले प्रवेश, प्रवर्गनिहाय रिक्त जागांची माहिती सादर करायची आहे