रेल्वे सुरक्षा दल मध्ये 4656 जागांची भरती | rpf bharti 2024

rpf recruitment 2024 news : रेल्वे भर्ती बोर्डानं नोकरीच्या शोधात असेल्या दहावी पास व पदवीधर उमेदवारांना खूषखबर दिली आहे.

RPF Notification 2024: नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास व पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भर्ती बोर्डानं आरपीएफ कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदांच्या भर्तीची अधिसूचना काढली आहे. या अंतर्गत कॉन्स्टेबलची ४२०६ आणि उपनिरीक्षकाची ४५२ पदं भरली जाणार आहेत.

पदाचे नाव & तपशील: 

जा. क्र.पद क्र.पदाचे नावपद संख्या
 RPF 01/20241RPF सब इंस्पेक्टर (Sub Inspector)452
RPF 02/20242RPF कॉन्स्टेबल (Constable)4208
 Total4660

अर्ज करण्याची तारीख

येत्या १५ एप्रिलपासून भरती प्रक्रिया सुरू होणार असून १४ मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. अर्ज ऑनलाइन करता येणार आहेत. अर्ज करण्याआधी सूचना काळजीपूर्वक वाचा. सध्याची अधिसूचना संक्षिप्त असून सविस्तर अधिसूचना एप्रिलमध्ये काढण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. इथं होम पेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करावं लागेल. ही भर्ती परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होणार आहे.

वयोमर्यादा

आरपीएफ उपनिरीक्षक पदासाठी वयोमर्यादा २० ते २५ वर्षे आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करून इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय १८ ते २५ वर्षे असणं आवश्यक आहे. वयाची मोजणी १ जुलै २०२४ पासून केली जाईल.

शैक्षणिक पात्रता

आरपीएफ भर्ती २०२४ कॉन्स्टेबल पदासाठी इच्छुकांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून १० वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, उपनिरीक्षक पदासाठी मान्यताप्राप्त मंडळाची पदवी असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 20 ते 28 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 28 वर्षे

Leave a Comment